रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा, विकास गोगावले यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

Share Now

625 Views

महाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खरवलीच्या नवीन इमारत कामाचा तसेच खरवली ग्रामपंचायतीमधील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा शनिवार 30 जानेवारी 2021राेजी दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले, राजिप सदस्य मनोज काळीजकर,महाड पंचायत समिती सदस्या सौ अपर्णा अनिल येरुणकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शारदा गायकवाड, मुख्याध्यापक निकिता जाधव, भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा संघटक समीर ऊर्फ अण्णा म्हामुणकर, माजी सरपंच प्रमोद म्हामुणकर, जयंत गुडेकर, तंटामुक्त अध्यक्ष अर्जुन पवार, पोलिस पाटील सोनू तरे, खरवली शाखाप्रमुख सुरेश कळमकर, विलास तरे, धोंडीराम कळमकर, तानाजी जाधव युवासेनेचे विजय मालुसरे, शिवाजी कदम आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आ. भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नाने राजिप सदस्य मनोज काळीज कर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाड तालुक्यातील राजीप शाळा खरवली येथील नूतन इमारती करिता समग्र शिक्षण अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेकडून आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर खरवली ग्रामपंचायत कार्यालय ते मालुसरे चिकन शॉप पर्यंतचा रस्ता जिल्हा नियोजनमधून सुमारे पंधरा लाख रुपये एवढा निधी खर्च करून मार्गी लावण्यात येणार आहे अशी माहिती राजिप सदस्य मनोज काळीज कर यांनी दिली आहे. या कामांना गती मिळाल्याने राजिप शाळांमधील विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *