बापदेव महाराजांवरील निस्सीम भक्तिने अष्टमीकर एकवटले,हे मंदिर अध्यात्मिक विचारांचे केंद्र होईल : खा.सुनिल तटकरे

Share Now

450 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) अष्टमी गावात अनेक वर्षे येत आहे.निवडणुक प्रचार का अन्य कार्यक्रमांचे निमित्ताने येत असताना एवढा जनसमुदाय कधी जमलेला पाहिला नव्हता. मात्र आज आपल्या ग्रामदैवताच्या मंदिराचे जीर्णोद्धार होत असल्याचा आनंद सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.आज सर्व अष्टमीकर एवढ्या मोठ्या एकजुटीने एकत्र आलेत ते फक्त ग्रामदैवत बापदेव महाराजांवरील त्यांची असलेल्या निस्सीम भक्तीमुळे.१२ व्या शतकातील मंदिर वाटावे असे भव्य मंदिर २१ व्या शतकात नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात येणार आहे.हे मंदिर भव्यदिव्य बांधत असतानाच पुढील काळात अध्यात्मिक विचारांचे केंद्रही हे मंदिर ठरेल असा विश्वास खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. अष्टमी ग्रामदैवत बापदेव महाराज मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन व स्वागत कमानींचे उद्घाटन त्यांचे हस्ते करण्यात आल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

अष्टमी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज चौकात या कार्यक्रमांचे निमित्ताने झालेल्या सभेस पालकमंत्री ना. अदिती तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सभापती महेंद्र दिवेकर, सारिका पायगुडे, सुजाता चाळके,आफरीन रोगे, नगरसेविका नेहा पिंपळे, शिल्पा धोत्रे, स्नेहा आंब्रे,पुर्वा मोहिते,समीक्षा बामणे,नगरसेवक राजेंद्र जैन,समीर सकपाळ, जाफरभाई येरुणकर,महादेव साळवी,हेमंत साळवी,सलील खातु,शफी पानसरे,किशोर सुर्वे, विजय खैरे, राजन खरिवलीकर, जितेंद्र सदावर्ते, देविदास जाधव, ओमकार सरपाटील, रवींद्र ढवळे, गणेश सदावर्ते, गोपाळ तांडेल, इस्माईल कर्जीकर, गौरव बडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने अष्टमी चे ग्रामदैवत बापदेव महाराज मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात येत आहे.शनिवार ३० जानेवारी रोजी रायगडाचे खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच अष्टमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज,श्री हटकेश्वर, स्वामी समर्थ महाराज व कै. विठ्ठल(काका) पिंपळे यांचे नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वार कमानींचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष संतोष पोटफोडे करताना म्हणाले,धावीर महाराज, गिरोबा महाराज या रोहा शहरातील मंदिरांची बांधकामे झाली. आपल्याही ग्रामदेवतेचे मंदिर बांधावे अशी प्रत्येक अष्टमी वासीयाला वाटत होते.आज नगराध्यक्ष म्हणून मंदिराचे काम होत असल्यामुळे स्वप्नपुर्ती होत असल्यासारखे वाटत आहे. मात्र गावातील नगराध्यक्षाच्या हातून हे काम व्हावे ही त्या बापदेव महाराजांचीच इच्छा होती.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की,रोहा शहरात रक्तपेढीची नितांत गरज भासत होती.ग्रामस्थ व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याची मागणी केली. मात्र त्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती.अष्टमी नाक्यावर शासकीय जागा आहे मात्र तेथे काही लोक अनेक वर्षे वास्तव्य करत होते. त्यांना विनंती करताच रक्तपेढी साठी त्यांनी तात्काळ जागा सोडण्याचे मान्य केले हे कौतुकास्पद आहे. यापुढेही अष्टमी मध्ये महिला, बालभवन,व्यायाम शाळा कम्युनिटी हॉल आगामी काळात उभारण्यात येतील असे सांगत कुंडलिका नदी किनारी साकारण्यात आलेला संवर्धन प्रकल्प हवाई सफरीत किती विलोभनीय दिसतोय याची स्तुती राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी करताना समाधान वाटत आनंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *