कर्जत रेल्वे स्थानकाच्या छपरावर विजेचा शॉक, एक इसम जखमी

Share Now

598 Views

कर्जत ( जयेश जाधव)
कर्जत रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरील पत्र्यावर चढलेल्या एका इसमाला ओव्हरहेड विजेचा जोरदार शाँक लागल्याने तो जखमी झाला आहे.
सकाळी १०:३० च्या सुमारास रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.१ च्या पुणेकडील बाजूस बुकिंग आँफिसच्या पत्र्यावर एक इसम उमेश (संपूर्ण नाव नाही) वय २५ हा चढला गेला होता परंतु पत्र्याच्या वरुन गेलेल्या ओव्हरहेड वायरला स्पर्श होताच त्याला जोरात शाँक लागला .त्यामध्ये तो इसम ६० टक्के भाजलेल्या अवस्थेत खाली पडला. सदरील जखमी इसमाला रेल्वे पोलिसांनी तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणले तिथे त्याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जे.जे रूग्णालयात हलविण्यात आले. अशी माहिती रेल्वे पोलीस स्वप्नील मसणे यांनी पत्रकारांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *