वीज बिले माफ करा, माणगांव महावितरण केंद्रावर भाजप पक्षाचा मोर्चा, ग्रामस्थाने केले श्रमदान.. पैसे माञ ठेकेदाराच्या खिशात – संजय आप्पा ढवळे 

Share Now

85 Views

माणगाव (गौतम जाधव) महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या साथीने महावितरण कंपनीने महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची मोठी लुट व फसवणूक केले असून या सरकारच्या विरोधात व महावितरण कंपनीच्या विरोधात दि.५ /२/२०२१ रोजी भाजप माणगांव तालुक्याच्या वतीने संध्याकाळी ४.०० वाजता माणगांव महावितरण कंपनीच्या कार्यालयावर ‘टाळा ठोको व हल्लाबोल’आंदोलन करण्यात आले.

यावेळी संजय आप्पाशेट ढवळे भाजपचे माणगांव तालुका अध्यक्ष यांनी पुढे बोलताना असे सांगितले की देशभरात तसेच महाराष्ट्रात कोरोणा प्रादुर्भावाचे महासंकट असताना तासेच महाराष्ट्रात ४ कोटी जनता व ७५ लाख विज ग्राहक असताना या ग्राहकाचे कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा या महावितरण कंपनीने पाठविलेल्या आहेत. तसेच काहीचे कनेक्शन देखील कापले आहे. महाराष्ट्रातील जनता या महासंकटात आसताना हे काम प्रस्थापित महाविकास आघाडीच्या सरकारने व महावितरण कंपनीने केले आहे. याचे फळ जनता त्यांना नक्कीच योग्य वेळी देईल. तसेच महावितरण कंपनीने तर रायगड जिल्हात माणगांव तालुक्यात निसर्ग चक्री वादळात मोठ्या प्रमाणात झालेली गावातील लाईट पोल, डीप्याचे नुकसान झाले होते. गांवा गांवात एक  महिने दोन दोन महिने लाईटच नव्हती हे पोल लावण्यासाठी महावितरण कंपणीला प्रतेक गावातील ग्रामस्थानी एकञ येऊन मदत केली. चार चार पाच पाच दिवस कोरोना निसर्ग वादळाचे महासंकट असताना देखील श्रमदान केले परंतु या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेला लाखो कोटी रूपयाचा माणगांव तालुक्याला निधी हा आयता काही न करता ठेकेदाराच्या खिशात गेला असल्याचे सागीतले. याची माहिती महावितरण कंपनी केंद्र माणगांव यांच्याकडे मागीतली असता ते ही माहीती देण्यास टाळा टाळ करत आहेत असे शेवटी बोलताना सांगितले.

यावेळी योगेश सुळे ता,सरचिटणी. राजू मुडे शहर अध्यक्ष तालुका.नाना महाले.सुरेद्र साळी बाबुराव चव्हाण.संजय जाधव. शर्मिला सत्वे महिलाअध्यक्षा भाजप माणगांव तालुका.यशोधरा गोडबोले जिल्हा सद्दश.भाजप स्मिता भोईर जिल्हा सद्दश.दिपाली जाधव. उमेश साटम. निलम काळे.विशाळ गलाडे.यावेळी माणगांव महावितरण केंद्राचे उप विभागीय अभियांता हे उपस्थित न राहिल्याने भाजपच्या कार्यकत्याने जाब विचारत गोधळ घातला.यावेळी सायक अभियांता माणगांव महावितरण यांना निवेदन घेऊन पुढे विज बिल सुट देऊ असे भाजप कार्यकत्यानां आश्वासन दिले.                              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *