ग्रामस्थांच्या भावना पक्षश्रेष्ठींच्या पुढे मांडत सरपंच पदासाठी न्याय देणार : तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकारांचे निवी ग्रामस्थांना आश्वासन

Share Now

390 Views

रोहा (महेंद्र मोरे) वरसे ग्रामपंचायत स्थापने पासून निवी गावाला सरपंच पद लाभले नाही ही ग्रामस्थांची खंत रास्त आहे. यावेळी सरपंच पदाचे आरक्षण हे खुल्या वर्गासाठी असल्यामुळे यावेळी गावाला सरपंच पद मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे.गावातील वयोवृद्ध तसेच युवा वर्गातून अमित मोहिते यांना यावेळी संधी देत सगळ्यांची स्वप्नपुर्ती करावी अशी भावनिक मागणी ग्रामस्थांमधून माझ्याकडे होत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनातील भावना मी
पक्षश्रेष्ठी खा. सुनिल तटकरे यांचे पर्यंत पोहोचवत गावाला सरपंच पदासाठी न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन रोहा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विनोद पाशीलकर यांनी निवी ग्रामस्थांना दिले आहे.

यावेळी निवी गावाला सरपंच पद मिळावे अशी निवडणूक काळापासून मागणी असणाऱ्या ग्रामस्थांनी शनिवार ६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.आपल्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्यानंतर विनोद पाशीलकर यांनी ग्रामस्थांना हे आश्वासन दिले. यावेळी निवी ग्रामस्थ मधुकर बामुगडे, पांडुरंग चिपळूणकर,अनिल बामुगडे, गणेश राऊत, गुणाजी पोटफोडे, रघुनाथ भगत, काशिनाथ भगत, भाऊ बामुगडे, दत्ता भगत, लक्ष्मण मोहिते, नथुराम साळवी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या बड्या वरसे ग्रामपंचायतीच्या सर्वकश जडणघडणीत कायम महत्वाची भूमिका बजावणाऱ्या निवी गावाला ग्रामपंचायत इतिहासात कधीच सरपंचपद मिळाले नाही, हे सर्वश्रुत आहे. सरपंचपदाबाबत सार्वत्रिक नाराजी असतानाच आता सर्वसाधारण सरपंच आरक्षीत झाल्याने निवी गावाला सरपंच पदाचे बहुमान द्यावे, गावासह वरसे ग्रामपंचायतीचे लौकीक वाढवावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर यांची धाटाव येथे भेट घेत ग्रामस्थांनी केली आहे.

वरसे ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा व जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांचीही याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे ग्रामस्थांनी त्यांची भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या असता समोर आले आहे. तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर यांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर तेही आपल्या गावाला अमित मोहितेंच्या रुपाने एका युवा कार्यकर्त्याला सरपंच पदाची संधी देतीलअसा विश्वास आजच्या भेटीमुळे ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *