खालापूर येथिल एसीपीएल गोडावूनला आग, लाखो रुपयांचे नुकसान

Share Now

494 Views

खालापूर (संतोषी म्हात्रे)
खालापूर तालुक्यातील ढेकू येथे असलेल्या एसीपीएल कंपनीच्या गोडावूनला गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास अचानक भयानक आग लागली. भीषण आगीत गोडावूनमध्ये असलेले केमिकल व पेंट जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.
रात्री दोनच्या सुमारास गोडावूनला सॉर्टसर्किटमुळें आग लागल्याचे बोलले जात असून ह्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तात्काळ आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, भीषण आगीत एसीपीएल गोडाऊनचे नेमके किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *