रोहेकरांना अविस्मरणीय असा सोहळा,संवर्धन प्रकल्पाचे २१ फेब्रुवारी ला लोकार्पण, खा. शरदचंद्र पवारांची उपस्थिती

Share Now

854 Views

रोहा (महेंद्र मोरे) कुंडलिका नदीवर प्रत्येक रोहेकराचे प्रेम आहे.नदीच्या दोन्ही तिरांची प्रचंड दुरावस्था झाली होती.साबरमती नदीच्या प्रमाणे कुंडलिकेचे संवर्धन व्हावे अशी प्रत्येक रोहेकराची मनोमन इच्छा होती. रोहेकरांच्या स्वप्नातील नदीचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा संकल्प मागील २० वर्षे रोहेकरांनी दिलेल्या आशिर्वादाने आज पूर्ण होत आहे.रोह्याच्या वैभवात भर पडणारे नवे दालन असे संवर्धन व सुशोभीकरणाचे काम झाले आहे. याचा लोकार्पण सोहळा देशाचे नेते, खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते रविवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे.संवर्धन व सुशोभीकरणाचे काम आज पाहिले असता विहंगम असे काम झालेले दिसत आहे.

विलोभनीय अश्या या कामाचा उद्घाटन सोहळाही रोहेकरांना सदैव अविस्मरणीय राहील अश्या प्रकारे नियोजन करा अश्या सुचना रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी अंतिम टप्यातील कामाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना केल्या.शनिवार १३ फेब्रुवारी रोजी कुंडलिका किनारी साकारलेल्या नयनरम्य उद्यानात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर,उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर,शहर अध्यक्ष अमित उकडे ,सभापती मयूर दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर,नगरसेवक राजेंद्र जैन ,जाफरभाई येरुणकर, मयूर पायगुडे, वरसे सरपंच नरेश पाटील, उपसरपंच मनोहर सुर्वे, नंदकुमार म्हात्रे, सुर्यकांत कोलाटकर,नितीन पिंपळे, मिलिंद पिंपळे,समाधान शिंदे,रवींद्र चाळके, रियाज शेट्ये, कादिर रोगे, स्वप्नील धनावडे, प्रथमेश खानोलकर,अनिल सुर्वे आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह नगरपरिषदे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रोहा अष्टमी शहराची जीवनवाहिनी असलेल्या कुंडलिका नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर नदी संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आले आहे.सकाळच्या रम्य वेळी किनाऱ्यावर फेरफटका मारत व्यायाम करण्यासाठी दिड किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग बनवण्यात आला आहे. सायंकाळी याठिकाणी बनविण्यात आलेल्या उद्यानात निवांतपणे बसून जेष्ठ नागरिक, लहान मुळे समुद्रातील रेती व हिरव्यागार गवताच्या गालिचावर खेळत बागडत सुर्यास्ताचा विहंगम आनंद घेतील. अश्या प्रकारे नयनरम्य असे काम या संपूर्ण परिसरात खा. सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेने साकारण्यात आले आहे.शनिवारी या संपूर्ण कामाची अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी त्यांनी केली.२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोकार्पण प्रसंगी रोहा अष्टमी ला जोडणारा पुल, अष्टमी किनारा यावर रोषणाई करावी, यासोबतच शहरातील सर्व प्रमुख मार्ग, ग्रामदैवत धावीर महाराज मंदिरा सह सर्व मंदिरांचेवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात यावी अश्या सुचना त्यांनी सर्व नगरसेवकांना दिल्या.नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यालय यांसह शहर सभागृह, जेष्ठ नागरिक सभागृह अश्या सर्व वास्तु देखील रोषणाईने उजळून टाकत रोहेकरांच्या साठी एक अविस्मरणीय असा सोहळा साजरा करण्यात यावा यासंबंधी सर्व नियोजन करा अश्या सूचना त्यांनी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *