आरएफओ दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विनोद शिवकुमार व रेड्डी यांना फाशी द्या, महाड तालुका बेलदार समाजाकडून तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना निवेदन.

Share Now

878 Views

महाड (वार्ताहर) 25 मार्च रोजी 2021 रोजी आरएफओ हरीमाळ मेळघाट अमरावती या पदावरील दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या नसून खून आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणारे अधिकारी अत्यंत नीच प्रवृत्तीच्या आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार नाही त्यांना नुसते बडतर्फ करून चालणार नाही तर त्यांना फाशीची शिक्षा द्या. तसेच यासाठी फास्टट्रॅक कोर्टामार्फत केस चालवावी व वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्त करावी अशी मागणी करणारे निवेदन महाड तालुका बेलदार समाजातर्फे महाड तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे.

दीपाली चव्हाण यांना न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कोकण विकास प्रबोधिनी संस्थापक अध्यक्षा कुमुदिनी चव्हाण व महाड तालुका बेलदार समाज अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांनी 27 मार्च रोजी 2021 रोजी महाड तहसील कार्यालय व महाड पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन देण्यात आले.

वन विभागामध्ये कार्यरत असणार्या दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा डी के ग्रुप मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक सवाई यांनी केली असून विविध खात्यांमध्ये कार्यरत असणार्या महिला कर्मचाऱ्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *