मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, 20 जण जखमी, 2 ठार

Share Now

829 Views

खालापूर (संतोषी म्हात्रे )
मुबंई पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर हद्दीत माडप ब्रिज जवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मिनीबस ने आरामबसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मिनीबस मधील 2 जण ठार झाले तर 20 जण जखमी झाल्याची घडना घडली. वसईहुन महाबळेश्वर येथे सहलीसाठी जात असताना माडप ब्रिज जवळ हा भीषण अपघात घडला.
या अपघाताची माहिती मिळताच डेल्टा फोर्स, आर्यन टीम, एक्स्प्रेस वाहतूक पोलिसासह, अपघातग्रस्त टीमचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. जखमींना तात्काळ एमजीएम व लोकमान्य टिळक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही काळ एक्स्प्रेसवेवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *