शरद पवार यांनी केला लाडक्या श्वानचा जलदान विधी,  धम्म भन्ते प्रज्ञाज्योती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

Share Now

114 Views

वावेदिवाळी (गौतम जाधव) माणगावमधील सामाजिक कार्यकर्ते शरद काशीराम पवार यांनी त्यांच्या घरी त्यांच्या लाडक्या जर्मन शेफर्ड श्वान रॉकसीच्या मृत्यू नंतर त्यांनी बौध्द धम्म गुरू भन्ते प्रज्ञाज्योती यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या माणगांव निवासस्थानी बोलावून सोमवार दि.१२ एप्रिल २०२१ रोजी जलदान विधी हा कार्यक्रम केला, शरद पवार यांनी १४/०४/२०१५ रोजी मुंबई लालबाग येथून दीड महिन्याचे हे पिल्लू घरी बाळगायला आणले होते.

ते पिल्लू सहा वर्षाचे झाल्यावर अचानक ताप आले व ते आजारी पडून ४ एप्रिल २०२१ रोज़ी तिचा मृत्यू झाला हा मृत्यू आपण एका बाळगलेळ्या प्रांण्याचा नसून घरातील आपला एक सदस्यचा मृत्यू झाल्याचे शरद पवार कुटुंबाला मोठे दुःख वाटले व माणूस मेल्यावर ज्या प्रकारे दफन विधी कार्यक्रम करतात त्याच प्रकारे आपल्या या बालगलेल्या रॉकशी श्वानचे दपन करण्यात आले.पवार कुटुंबामध्ये त्यांची पत्नी सुचिता, मुलगा निलेश, नितीन, मुलगी नीलम यांच्या सोबत ही श्वान घरातील एक सदस्य होती.तिच्या जीवावर हे कुटुंब घर सोडून कुठे ही जात असत. ही श्वान कुटुंब वत्सल होती. लाडकी श्वान मयत झाल्या मुळे तिचा जलदान विधी हा कार्यक्रम बौध्द धम्माच्या रितीनूसार ठरवून काही ठराविक लोकांना आमंत्रित केले होते.

या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी चे माणगाव तालुका अध्यक्ष सारथी महामुणकर, बौद्धजण पंचायत समितीचे माणगाव तालुका माजी उपाध्यक्ष नंदकुमार पवार, रमेश घोगरे, रोहित सकपाळ उपस्थित होते.दाखणे गावाचे शरद पवार यांच्या कुटूंबाणे या मुक्या प्राण्याचे श्वानचा दपन विधी व जळदान विधी आपल्या घरी केल्याने माणगांव तालुक्यात ही एख आदर्श घटना घडली असून मंगल मैत्री करुनेचे दर्शन घडल्या सारखे पवार कुटुंबाला वाटत आहे.

श्वान राँकसी हिला सर्व माराठी मधून सांगितले जायाचे ते ती आयकायची घरातील सदस्य प्रमाणे तीची उठबस असायची.तसेच धम्म भन्ते प्रज्ञाज्योती यांनी या जळदान विधी कार्यक्रमात बोलताना तथागत भगवान बुध्द यांच्या धम्मातील देवदत्तने मारलेल्या हंसाला बाण तसेच नालागीरी हाती.बुध्दाचा कंठक घोडा.असे अनेक प्राणी माञाची त्याणी प्रवचनाच्या माध्यमातून उदाहरणे दिली प्राणी माञावरीण मंगल मैञी सांगितली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *