श्रीवर्धन महाड विधानसभा मतदार संघातर्गत छायाचिञासह मतदार निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

Share Now

107 Views

वावेदिवाळी (गौतम जाधव) सध्यस्थितीत छायाचिञासह मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे.त्या अनुषंगाने माणगांव तालुक्यातील १९३- श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातर्गत असणाऱ्या ७४ व १९४- महाड विधानसभा मतदार संघातर्गत असणाऱ्या ११३ अशाप्रकारे एकुण १८७ मतदान केंद्रामध्ये मतदार नोंदणी,मतदार तपशिलामध्ये दुरूस्ती तसेच मयत,दुबार व कायम स्वरूपी स्थलांतरीत मतदारांची वगळणीबाबत दावे व हरकती स्विकारणेची प्रकिया सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत सुरू आहे.

यास्तव.माणगांव तालुक्यातील सर्व मतदार यादीमध्ये छायाचिञ नसलेले मतदार यानी त्याचे रंगीत पासपोर्ट साईझ फोटो नमूना नं ८ सह संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे पुढील आठ रोजात जमा करावेत.तसेच सदरहुन मयत अथवा कायम स्वरूपी स्थलांतरित असल्यास त्यांचे कुटुंब प्रमुख यांनी संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे नमुना नं ८ करिता या पोर्टलवरूनही आँनलाईन अर्ज करू कशता.तसे ही सुविधा आपले जवळच्या तळाठी कार्यालय व तहसिल कार्यालय माणगांव येथील निवडणूक शाखेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.असे अमित शेडगे.मा.मतदार नोंदनी अधिकारी.१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ तसेच बी.वाय भाबड सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा प्र.तहसिलदार माणगांव यांनी प्रेस नोट काढून मतदार जनतेस आवाहन केले आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *