नागलवाडी येथील पाच मजली इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू , शवविच्छेदनाकरिता बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू

Share Now

1,056 Views

महाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नागलवाडी येथे पाच मजली इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड एमआयडीसी मधील नागलवाडी फाटा येथे पार्किंग प्लस चार मजली इमारतीचे काम सुरू असताना सुमारे साठ फूट उंचीवरून पडून याठिकाणी काम करणारे कामगार प्रभाकर सीताराम उसगावकर वय 50 मुळ विन्हेरे यांचा मंगळवार 27 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला असून त्यांचे शव विच्छेदना करीता बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे.

सदर घटनेचा पंचनामा महाड एमआयडीसी पोलिस ठाणे सुरू केला असून या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अकस्मात मृत्यू रजिस्टरमध्ये सीआरपीसी 174 प्रमाणे करण्यात आली असून अधिक तपास महाड एमआयडीसी पोलिस करीत आहेत. दरम्यान,महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वाय आर खाडे यांनी या घटनेनंतर बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन घटनेची सखोल चौकशी सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *