पॅरासेलिंग दोरी तुटून बापलेक पडले खाली, मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी

Share Now

571 Views

मुरुड (अमोलकुमार जैन) मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक खाली पडून अपघात झाला. या अपघातात मुलगा वेदांत गणेश पवार (15) हा जागीच ठार झाला असून वडील गणेश पवार गंभीर जखमी झाले आहे.गणेश पवार यांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. तर पॅरासेलिंग चालकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पवार हे आपलं मुलगा वेदांत व कुटूंबासह पुणे, कसबा रोड येथून मुरुड येथे फिरण्यास आले होते. त्यावेळी समुद्रावर मौजमजा करीत सुट्टीचा आनंद लुटत होते.मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पॅरासेलिंग करण्यासाठी पवार बापलेक दोघेही गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून खाली कोसळले.
या अपघातात वरून वेदांत हा पडल्यानंतर जागीच ठार झाला. तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमी गणेश पवार यांना मुरुड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर वेदांत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुगणल्यात पाठविण्यात आले आहे. या अपघाताबाबत पॅरासेलिंग चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *