सामाजिक कर्तव्य भावनेने हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स

Share Now

303 Views

अलिबाग (प्रतिनिधी) कोविड-19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णांसाठी उपयोगी पडावेत यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 20 माक सीजन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आज (दि.28 मे) रोजी 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकड़े जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले. यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे सीएसआर चे लहू रौधल उपस्थित होते.

हिंदाल्को इंडस्ट्रीजचे युनिट सीएसआर चे लहू रौधल यांनी यावेळी सांगितले की, आमचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच.आर. हेड सुधीर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी आरसीएफ येथील कोविड केअर सेंटरला 20 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले होते. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला. तो ताण कमी व्हावा व रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या हेतूने हे ऑक्सिजन सिलेंडर्स देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार हे ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हा सामान्य रुग्णालयास देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *