पत्रकार हर्षद कशाळकर मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकाराकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Share Now

1,046 Views

अलिबाग (प्रतिनिधी ) अलिबाग येथील लोकसत्ताचे जिल्हाप्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना शेतकरी कामगार पक्षाचे आ.जयंत पाटील, आ.पंडित पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या आवारात घुसून मारहाण केली होती. त्या घटनेचा सबंध जिल्ह्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध नोंदविला. तर पत्रकार मारहाण प्रकरणाचा निषेध करीत सोमवारी जिल्ह्यातील पत्रकारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेल्याची घटना घडली. संबंधीत दोषी व्यक्तींवर कारवाई नाही झाली तर भविष्यात अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना यापूर्वीसुद्धा अलिबाग सहित रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. अशा तीव्र भावना व्यक्त करीत पत्रकारकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी पत्रकारांनी केली.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने यावेळी 32 रायगड लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी नसताना मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल आ. जयंत पाटील,आ. पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारावर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपण स्वतः गुन्हा दाखल करावा,या प्रकरणाची चौकशी जलदगतीने व्हावी,आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यायालयात खटला दाखल करावा,पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात यावा,पत्रकार याला ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची छायाचित्रे आम्हास मिळावी, मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रकियेत अडथळा निर्माण केल्याबद्दल आ. जयंत पाटील,पंडित पाटील,यांच्या विरोधात भा.द.वि.कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *