राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद पवार यांची पेण तालुक्यातील मौजे रावे येथे धडक कारवाई, जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Share Now

73 Views

अलिबाग (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड जिल्ह्याच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे, उप अधीक्षक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद पवार यांच्यासह पथकातील श्री.अकुंश बुरकुल, दुय्यम निरीक्षक, रोहा, श्री.रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक, खालापूर-सुधागड, श्रीमती नरहरी, सहायक दुय्यम निरीक्षक, जवान श्री.गणेश नाईक, श्री.गणेश घुगे यांनी दि.08 जून 2021 रोजी पेण तालुक्यातील मौजे रावे येथे छापा टाकून धडक कारवाई केली.

या धडक कारवाईत तब्बल 4 गुन्हे नोंद करण्यात असून 10 लिटर गावठी दारू, 5 हजार 825 लिटर रसायन, असा एकूण रुपये 1 लाख 38 हजार 200/-किंमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *