वादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार, शासकीय निधीची वाट न पाहता वाघेरी ग्रामस्थांनी घेतला निर्णय

Share Now

1,063 Views

महाड (दीपक साळुंखे) या नुकत्याच झालेल्या चक्रीवादळ व वादळी पावसामुळे महाड तालुक्यातील राजिप शाळा वाघेरीची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन नादुरुस्त झाली होती. शाळेच्या इमारत दुरुस्तीकरिता शासकीय निधीची वाट न पाहता वाघेरी मधील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा बसून शाळेच्या इमारतींवरील पत्रे पूर्णपणे उडून गेले होते तसेच भिंतीदेखील नादुरुस्त झाल्या होत्या कोरोना महामारीमुळे शासकीय निधी उपलब्ध होत नसल्याने श्री देव काळभैरव ट्रस्ट वाघेरी ग्रामस्थ, राजी प्रशाळेमधील माजी विद्यार्थी यांनी पुढाकार घेत शाळेच्या इमारत दुरुस्तीकरिता सुमारे दोन लाख रुपयांची देणगी उभी केली असून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

रायगड जिल्हा परिषद शाळा वाघेरी सन 1961 मध्ये स्थापन करण्यात आली असून सुरुवातीला पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी सुरू होते आता मात्र पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या यामुळे इमारतीला शासकीय निधी उपलब्ध होण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या मात्र ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे सुरू राहावे. गावातील शाळेत चे जतन व्हावे यासाठी वाघेरी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार महाड तालुक्यातील अन्य गावांतील ग्रामस्थ व नागरिकांकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *