शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार : आ. भरतशेठ गोगावले

Share Now

72 Views

महाड (दीपक साळुंखे) शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार असल्याचे प्रतिपादन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरतशेठ गोगावले यांनी महाड शहरातील कांगोरीगड या शिवसेना कार्यालयात सोमवार 14 जून 2021राेजी दुपारी तीन वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी बोलताना केले आहे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. कोकणकडा मित्रमंडळ महाड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या यशस्वी आयोजन नियोजनाने होणार्या 348 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर 22 व 23 जून 2021 राेजी होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा यूट्यूब तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे शासनाच्या नियमानुसारच हा सोहळा साजरा होईल अशी माहिती आ. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी बोलताना दिली आहे. यावेळी आ. भरत गोगावले कार्यकारी समिती अध्यक्ष श्री नितिन पाऊले, कार्यकारी समिती कार्याध्यक्ष परेश सोनावळे, संस्थापक अध्यक्ष कोकणकडा मित्रमंडळ चे सुरेश पवार, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.

तिथीप्रमाणे होणार्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यांकरिता प्रमुख अतिथी म्हणून मा. खासदार श्रीकांत शिंदे, रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे उपस्थित राहणार आहेत. महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडून आलेल्या आदेशाचे पालन करूनच शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होईल. विधिवत पूजा व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम या वेळेला करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद आपल्या घरी राहूनच घ्यावा असे आवाहन आ. भरतशेठ गोगावले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *