रोह्यात भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार, डॉक्टर, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार

Share Now

343 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) आजारी पडल्यावर देवानंतर आपला विश्वास डॉक्टरांवर असतो. याची प्रचिती अनेकांना आली आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी व सुरक्षितता सांभाळत डॉक्टर, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते व वेळोवेळी कोरोनाची स्थिती आपल्याला घरबसल्या लक्षात आणून देणारे पत्रकार यांनी अविरत सेवा दिली. अश्या अनेक विधविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत भारतीय मानवाधिकार संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ.अस्लम शेख व त्यांच्या अर्धांगीनी डॉ.सायरा शेख यांनी सत्कार कार्यक्रम आयोजित केला. रविवारी सांयकाळी डॉ. अस्लम शेक यांच्या मानवाधीकर संस्थेच्या ऑफीसमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ.ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सायरा शेख, अँम्बुलँस ड्रायव्हर ललित सदावर्ते, आलशीफा मेडिकल व्यवस्थापक शेफ अली, पोलीस हणमंत धायगुडे, हवालदार चेरकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश काफरे, आदित्य कोंडाळकर, सईद जोगिलकर, दिलीप महमुनी, असगर अली खान, समीर दळवी मनसुर नाडकर, ऐजाज वासकर, रियाज कडू, जावेद नाडकर, पत्रकार रविंद्र कान्हेकर, उद्धव आव्हाड, अक्षय जाधव यांचा सत्कार रायगड जिल्हा मानवाधिकार संस्थेचे अध्यक्ष डॉ. अस्लम शेख व माझे कोंकण चनलचे उपसंपादक सिद्धेश शिगवण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सिद्धेश शिगवण म्हणाले कि, आज आपला देश कोरोना महामारिशी लढत आहे. या लढ्यात डॉक्टर, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्याँनी लोकांना वाचविण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. अश्या नागरीकांचा सत्कार होणे आवश्यक आहे. अश्या परिस्थितीत रोह्यातील नामवंत डॉक्टर डॉ.अस्लम शेख यांची या कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. त्यामुळे डॉक्टर अस्लम शेख यांचे रोहा तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *