रोहा मुरुड मार्गावर कवाळटे येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद

Share Now

253 Views

रोहा (सचिन साळुंखे) रोहा तालुक्यातील केळघर मार्गे मुरुड रस्त्यावर दरड कोसळली आल्याने रस्ता बंद झाला आहे, रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या दगडी साचल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. रस्त्यावर दगड, मातीसह मोठ मोठी झाडे उलमलून पडली आहेत. येथील सामजिक कार्यकर्ते महेश वरक , चंद्रकांत जाधव, व अन्य नागरिकांनी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला परंतु दगडी मोठया आल्याने त्यांचे प्रयत्न, असफल झाले.

गेले काही वर्ष सातत्याने या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत, गुरूवार दि.17जून रोजी पहाटे या भागात दरडी कोसळण्यास सुरवात झाली, गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगर खचत गेला आणि पहाटे मोठ मोठे दगड झाडे रस्तायवर आले. कोणतेही वाहन जात नसल्यानें तसेच या वेळी हा भाग निर्मनुष्य आल्याने कोणतेही जीवित हानी झाली नाहीं, परन्तु रोहा मुरुड या दोन तालुक्यांचा दळण वळणाचा मार्ग बंद झाला आहे,

Leave a Reply

Your email address will not be published.