रोहा मुख्याधिकाऱ्यांनी घेतली प्लास्टिक हटाव मोहीम,जनजागृती नंतर धडक कारवाई,

Share Now

119 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून दयानंद गोरे यांची नियुक्ती होत त्यांनी नुकताच पदभार स्विकारला.त्यानंतर तातडीने त्यांनी शहरातील प्लास्टिक पिशव्या व अन्य वस्तुंच्या वाढलेल्या वापराची दखल घेत ‘प्लास्टिक हटाव ‘ मोहीम राबविण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी’ प्लास्टिक हटवू या ,पर्यावरणाचे रक्षण करूया ‘ असा संदेश देणारे फलक लावत जनजागृती केली. त्यानंतर प्लास्टिक विरोधी पथक तयार करत शहरातील नागरिक व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पत्रके वाटली. यादरम्यान ज्यांच्या कडे प्लास्टिक आढळले अश्या व्यापारी व नागरिकांचे वर धडक कारवाई करत त्यांचे कडून १३ हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली.बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या मोहिमेची अमलबजावणी केली असल्याचे बाजारातील गायब होत असलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वरुन दिसत आहे.

रोहा अष्टमी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्षा रिदवाना शेट्ये, स्वच्छता व आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर व सर्व नगरसेवक यांचे नेतृत्वाखाली राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर झाल्यापासून वेळोवेळी प्लास्टिक हटाव मोहीम हाती घेण्यात आली. मध्यंतरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु लागल्यामुळे सर्वप्रथम त्यापासून शहरातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना टीम नगराध्यक्षांच्या वतीने करण्यास प्राधान्य देण्यात आले होते.त्यातच बराच काळ पूर्णवेळ मुख्याधिकारी नगरपरिषदेस नसल्यामुळे प्लास्टिक हटाव मोहिमे कडे काहीअंशी दुर्लक्ष झाले होते. मात्र नवे मुख्याधिकारी म्हणून दयानंद गोरे यांनी पदभार घेताच पुन्हा एकदा शहरात प्लास्टिक हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.प्लास्टिक मुळे पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच. यासोबतच मानवासह भटक्या मुक्या प्राण्यांच्या जीवावर हे प्लास्टिक दुष्परिणाम करतो.शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंचा वापर व साठा करणे टाळावे. यापुढे असा साठा कोणाकडे आढळल्यास त्यांच्यावर आर्थिक दंडा सह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रोहे अष्टमी मधील नागरिक हे पर्यावरण प्रेमी आहेत त्यामुळे ते नक्कीच या मोहिमेला साथ देत प्लास्टिक मुक्त रोहा शहर करण्यास साथ देतील असा विश्वास मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *