रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे 150 रिक्षांना कोरोना प्रतिबंधात्मक बॅनर प्रदान

Share Now

130 Views

रोहा (वार्ताहर) रोह्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातुन व रोटरी सदस्य तसेच शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक लियाकत हफीज व राम नाकती यांच्या आर्थिक योगदानातून शहरातील 150 रिक्षाचालकांना कोरोना प्रतिबंधात्मक बॅनर प्रदान करण्यात आले.

तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रिक्षाचालक व प्रवाशी यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची नितांत गरज होती त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून हे कोरोना प्रतिबंधात्मक बॅनर 150 रिक्षांवर लावण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी दिली. या प्रोजेक्टची एकूण किंमत अडतीस हजार इतकी असल्याचेही प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी सांगितले.

शुक्रवार दिनांक 18 जुन रोजी रिक्षाचालकांना हे कोरोना प्रतिबंधात्मक बॅनर देण्यात आले यावेळी रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,रोटरी क्लब रोहा सेंट्रल प्रेसिडेंट मयुर दिवेकर,पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर,रिक्षा संघटना अध्यक्ष रमेश साळवी,रोटरी सदस्य राकेश कागडा,गणेश सरदार,सुचित पाटील,लियाकत हफीज,राम नाकती,विजय दिवकर ,रोटरेक्ट क्लबचे आकाश रूमडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे घेण्यात आलेल्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर व सर्व सदस्यांचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published.