दहा गाव माजी विद्यार्थी संघटनेकडून एल.बीं. पाटील यांचा सत्कार

Share Now

393 Views

महाड (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदश्यपदी रायगडभूषण प्रा .एल.बी.पाटील यांची निवड झाल्याने दहा गाव माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विलास गावंड यांच्या शुभहस्ते श्री.सौ एल.बी.
पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गावंड म्हणाले की, एल.बी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून रायगड मध्ये अनेक कवी लेखक घडविले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक ए.डी.पाटील यांनी सांगितले की, एलबी हे कोकणच्या साहित्य दिंडीतील मोठे वारकरी आहेत.

सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर म्हात्रे, एच.के.गावंड, एल.एन.भगतसर यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. आपले मनोगत मांडतांना प्रा. एल.बी.
म्हणाले की, पद्मभूषण मधुभाई,समाजातील ज्येष्ठ,माझा असंख्य मित्रवर्ग यांचे प्रेम आणि आशीर्वाद यांच्यामुळे जी माझ्याकडून साहित्य सेवा घडली त्यातून हे मला यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.