महाड तालुका काँग्रेसच्या वतीने मा. खा.काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा

Share Now

127 Views

महाड (वार्ताहर) महाड तालुका काँग्रेसच्या वतीने *मा.खा.काँग्रेसचे आदरणीय नेते राहुलजी गांधी साहेब यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला* त्याच प्रमाणे महागाई विरोधात महिलांनी बिना तेलाचे पदार्थ बनवले आणि मोदी सरकार विरोधात घोषणा केल्या. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.आम.माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने आज संपूर्ण रायगड जिल्ह्यात मा.खा. राहुलजी गांधी साहेब यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

महाड मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष अनिल येरूणकर, जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक संदीप जाधव,खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडूशेठ देशमुख, नगरसेवक वझीरभाई कोंडीवकर, पंचायत समिती सदस्य अपर्णा येरूणकर, तालुका महिला अध्यक्ष स्नेहा मनवे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुदेश कलमकर, महिला शहर अध्यक्ष अस्मिता शिंदे,नगरसेवक विद्या साळी,माजी तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे,तालुका खजिनदार जगदीश पवार, सरचिटणीस सुनील जाधव,अल्पसंख्याक अध्यक्ष इम्तियाज लंबाडे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष आश्रफ भाई कापडी,विधानसभा युवक अध्यक्ष स्वरूप खांबे, जिल्हा युवक उपाध्यक्ष मयूर चांदोरकर, गजानन काप, भाऊ दिविलकर, प्रसाद देशमुख, अविनाश चौधरी, विनोद भोसले, राजेन्द्र कळमकर, विलास जगताप, संजय मेहता,विकास शिंदे,विनोद कदम,अनिल अजगरे,नागेश देशमुख, स्वप्नील पोटसुरे,राहुल देशमुख, आकाश हाटे,जफर झटाम ,प्रमोद मांडे,रमण डावरुंग इत्यादी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *