कोकणात निसर्गाने हिरवी शाल पांघरली. फेसाळ धबधबे पर्यटकांना ठरतात आकर्षित, कोरोनामुळे धबधब्यांकडे पर्यटकांची पाठ

Share Now

69 Views

चिल्हे (श्याम लोखंडे) कोकणात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या तसेच इतिहासात निसर्गरम्य प्रसिद्धीस असलेली कोकण सौंदर्याची खाण हे देश विदेशातील अनेक पर्यटकांसाठी विविध स्थळे आकर्षित ठरतात त्यातच पावसाळ्यात आनंद निर्माण करून देणारे अनेक धबधब्यांकडे कोरोनामुले पर्यटकांनी पाठ फिरत असून आता कोकणात निसर्गाने हिरवी शाल पांघरली असल्याने फेसाळ धबधबे पर्यटकांना आकर्षित व खाणाखुणा करतांना दिसत आहेत रायगड सह तळ कोकणात आता सौंदर्य फुलून आलेले पाहावयास मिळते. नद्या नाले धरणे तसेच भरभरून आणि मजेदार लहानांथोरांशी आनंद देणारे खरे डोंगर दऱ्या खोऱ्यातील घाटातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांना मोहिनी घालणारा व आकर्षित करणारे धबधब्यांडे पर्यटकांची पाठ फिरतांना दिसत आहेत तर याच काही पर्यटनस्थळी आपले उदारनिर्वाह चालवणारे धोटे मोठे व्यवसायिक यांच्यावर संक्रात निर्माण झाली आहे.

तब्बल दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे पर्यटकांनी धबधब्यांकडे पाठ फिरविली आहे.तर कोकणासह रायगड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच मुबंई गोवा महामार्गावरील सुकेळी, ऐनवहाल, महाड, तळा तर रोहा तालुक्यातील केलघर,घोसाळे, तलाघर, मेढा,आशा हिरव्यागार पर्वतरांगा उंच कड्याकपारीतून खोल दरीत कोसळणारे हे छोटे मोठे धबधबे हे पावसाळ्यात ओसंडून वाहतात आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला रायगड पर्यटनाचा आनंद निर्माण करून देणारे हे धबधबे आहेत मात्र कोरोना संकटात पर्यटकांविना रिकामे पडले असल्याचे दिसून येत आहेत.

ताम्हाणी घाटात निसर्गाने हिरवी शाल पांघरली त्यामुळे फेसाळ धबधबे पर्यटकांना खाणा खुणा आणि अति सौंदर्य चकित करणारा धबधबा पावसाळा सुरू झाला की ताम्हाणी घाटातील निसर्गाचे सौंदर्य खुलायला लागते. या वर्षी ही पाऊस अगदी वेळेवर जून महिन्यात सुरू झाल्याने सर्वत्र उष्म्याने घायाळ झालेले जन जीवन पावसाच्या गारव्याने थंड झाले. ताम्हाणी घाट म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची खाण. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच डोंगर आहेत. या डोंगरावर निसर्गाची किमया म्हणून हिरवी शाल पांघरून निसर्ग पर्यटकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असला तरी कोरोनामुळे गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी ही शासनाने बंदी आणल्यामुळे निसर्गात या दिवसात पर्यटकांचा दिसणारा किलबिलाट, आंबट शौकीकांचा धांगड धिंगाणा कुटुंबासह धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेणारे पर्यटकांची पाठ फिरतांना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *