जीव गेल्यावर सा.बा.खाते खड्यावर उपाय योजना करणार का ? प्रवाश्यांचा संतप्त सवाल

Share Now

126 Views

चिल्हे (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्गाच्या खड्ड्यांचे आता करायचे काय ठेकेदार सोडाच पण जीव गेल्यावर सा बा खात्याचे अधिकारी लक्ष देतील का दोन दिवसात चार फोर व्हीलर गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले तर दोन दुचाकी स्वार यात पडून जखमी झाले आहेत असा संतप्त सवाल नागोठणे खांब कोलाड दरम्यान करत असलेल्या प्रवाशी वर्गातून केला जात आहे.

मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब कोलाड दरम्यान पुगाव जवळ या मार्गाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडल्याने सुरू असलेल्या पावसात या खड्ड्यातपाणी साचून राहिला असल्याने १८ जून रोजी सदरच्या खड्ड्यात चार ते पाच फोर व्हीलर गाड्या आदळून मार्गालगत असलेल्या झाडांवर आपटल्याने सदरच्या गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तर दोन दुचाकी स्वार या खड्ड्यात पडून जखमी झाले असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे भला मोठा पडलेला हा खड्डा प्रवाशी वर्गांच्या आता चांगलाच जीवावर वेतला असून जीव गेल्यावर यावर उपाय योजना केल्या जातील का असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत

या खड्यामुळे सुरु झालेली अपघातांची मालिका थांबता थांबे ना १९ जून रोजी ११ वाजताच्या सुमारास एक फोर व्हीलर गाडी चक्क या खड्ड्यात अडकूनच बसली गाडीतील प्रवासी तसेच पुगाव ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांतून ही गाडी कशी बशी अधिक मेहनतीने तिला बाहेर काढली परंतु ही गाडी एवढी अडकली की चेसीसहित गाडीचा चाक चक्क तुटून निघाला असल्याचे दिसून आले .

तरी याबाबत जर ठेकेदार खड्डे बुजीविण्यात अपयशी ठरत असेल तर सा.बा. खात्याने याची तातकाल डागडुजी करावी अथवा मार्गात मधोमध असलेल्या या खड्ड्या परिसरात वाहतूक नियंत्रण कक्षाने काही उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत असून अन्यथा हा खड्डा कोणाचा ना कोणाचा जीव घेतल्या शिवाय राहणार नाही असे सर्वत्र बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.