रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे 2 शाळा व नगरपरिषद शिक्षण विभागाला सि.पी.यु. संच भेट, तालुक्यात एकूण 8 सि. पी. यु. संचाचे वाटप

Share Now

114 Views

रोहा (वार्ताहर) रोह्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे क्लब प्रेसिडेंट रो. मयुर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून तसेच रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखाना व रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डी. जी. एन. डी. रो. मंजु फडके यांच्या विशेष सौजन्याने बुधवार दिनांक 23 जुन रोजी  रोहे तालुक्यातील आणखी दोन शाळा व नगरपरिषद शिक्षण विभागाला एकूण 3 सि. पी. यु. संच प्रदान करण्यात आले.

उपनगराध्यक्षा रीदवाना शेटये,नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे,शिक्षण सभापती अफरीन रोगे,रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट तसेच रोहे अष्टमी नगरपरिषद स्वछता व आरोग्य सभापती मयुर दिवेकर ,माजी नगरसेवक व शाळा कमीटी अध्यक्ष अखलाख नाडकर,रोटरी सदस्य राकेश कागडा,रूपेश पाटील,मनोज बोराणा, जनाब कलाम, अक्षय सावंत, पूजा खुळे तसेच शिक्षक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत रोहे अष्टमी नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 4,डॉ. चिंतामणराव देशमुख माध्यमिक शाळा , रोहे नगरपरिषद शिक्षण विभाग यांना संगणक निर्मिती क्षेत्रातील नामांकित डेल्स कंपनीचे तीन सि. पी. यु. संच प्रदान करण्यात आले. याआधी रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे कोरोना लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सि. पी. यु. संच देण्यात आला होता तसेच मागील आठवड्यात तालुक्यातील अन्य 4 शाळांनाही सि. पि. यु. संच देण्यात आले होते.

क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात आपल्या वर्षभरातील कारकिर्दीचा समग्र आढावा घेतला.आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे , सर्व सहकारी नगरसेवक तसेच रोटरी सदस्यांनी केलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे आपण रोहेकरांसाठी काम करू शकलो असे आवर्जुन नमुद केले. शाळांना देण्यात आलेल्या सि. पी. यु. संचांचा उपयोग ऑनलाईन शिक्षणासाठी होणार असल्याचे उपस्थित शिक्षकांनी नमूद करून क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर व सर्व रोटरी सदस्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.