रोहा प्रेसक्लब ची सामाजिक बांधीलकी केले वृक्षारोपण , वृक्ष संपदा जोपासण्याची गरज राजेंद्र जाधव यांचे प्रतिपादन

Share Now

37 Views

कोलाड (श्याम लोखंडे) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.त्याच धर्तीवर गेली अनेक वर्षे रोहा प्रेसक्लब च्या वतीने पर्यावरणाची सामाजिक बांधिलकीतुन वटपिर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करत आहेत परंतु वृक्ष संपदा जोपासण्याची आजची गरज असल्याचे प्रतिपादन रायगड प्रेसक्लब चे उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र जाधव यांनी केले .

सालाबादप्रमाणे याही वर्षी रोहा प्रेसक्लब च्या वतीने रोहा तालुकतातील लांढर तळाघर निवी भुवनेश्वर रोहा मार्गालगत वड,पिंपळ,जांभूळ अशी वेगवेगळी प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोहा प्रेसक्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे,जेष्ठ पत्रकार आणि प्रमुख सल्लागार सुहास खरीवले,सौ समिधा अष्टीवकर,डॉ श्याम लोखंडे,सह प्रेसक्लबचे सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी जितेंद्र तुपकर, रुपेश साळवी यांनी यावेळी वृक्षारोपण केले. आपल्याना निसर्गाच्या सान्निध्यात सृष्टीचा दृक्‌श्राव्य अनुभव घेता यावा, यासारखे भाग्य ते कोणते? मनातील आठवणींची पिसे भिरभिरू लागली.धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली.यांच्यावर प्रेम करा त्यांची जोपासना करा त्यांचे रक्षण करा त्याच बरोबर समाजातील प्रत्येक माणसाने एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना मनाशी बाळगत पर्यावरण वाचवण्याकरिता मदत केली पाहिजे असा संदेश यावेळी दिला. तसेच अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा, मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे तसेच उन्हाळ्यात लावले जात असलेले वणवे यांनी पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.

एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे.आज प्रमाणाबाहेर जंगलतोड होत आहे. प्रदूषण, अवर्षण, जमीनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत. निसर्गाचे संतुलन बिघडण्यास कोण जबाबदार… याचा सखोल विचार होत आहे का? दिसेल त्या झाडावर घाव घालायचे आणि मिळणार्‍या जागेत घरे, कारखाने उभारायचे हे काम माणसांनीच सुरू केले. पैसा कमावणे हे आजच्या युगाचे एकमात्र ध्येय झाले आहे. पैशाच्या मागे लागत असताना आपण ज्या झाडाच्या आश्रयाला आहोत त्याच झाडावर आघात करून आपला सर्वनाश करून घेत आहोत, हे माणसाच्या लक्षात येत असेल पण मनातला लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाही. सुंदर निसर्गाला आता विनाशाची घरघर तर लागणार नाही ना? मनात शंकेचे काहूर निर्माण होते. असे असेल तर लोभी माणूसच निसर्गाच्या घरघरीला कारणीभूत आहे.मात्र आज पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण येथे वृक्ष लागवड केली आहे गेली अनेक वर्षाचा हाती घेतलेला उपक्रम फलदायी ठरत आहे लावली झाडे आज आज आपल्याना सावली देत असल्याचा शेवटी जाधव यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *