साळाव, साखरखाडी पुलाला धोका, सार्व. बांधकाम विभागाचे दूर्लक्ष

Share Now

745 Views

बोर्लीमांडला (अमोलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यानां जवळ आणणाऱ्या कुंडलिका खाडीवरील साळाव रेवदंडा पुलाला जोडणाऱ्या भागात भेग (चीर) पडली आहे. त्यामुळे सावित्री पुलाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना ? अशी भीती निर्माण होत आहे. रायगड जिल्ह्यातील असलेल्या अनेक पुलांची दुरवस्था झाली असली तरी त्याकडे सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहॆ. त्यामुळे अनेक पूलांची अवस्था हि बिकट झाली असली तरी त्याचे सोयसुतक या अधिकारी यांना नाही . त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव आणि सखर खाडी पूल या दोन महत्त्वाच्या पुलांची दुरवस्था झाली आहॆ. त्यामुळे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाचा विकास खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहॆ.
रायगड जिल्ह्यातील साळाव रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले परंतु ह्या पुलाची दुरावस्था झाल्यमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यमुळे पृन्हा परत एकदा या तिन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहॆ. साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम हे १९८६ साली करण्यात आले असून या पुलाची लांबी ५१० मीटर एवढी आहॆ. ह्य पुलाला बारा गाळे आहेत. ह्या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या काळात झाला आहे. त्यामुळे रोहा, मुरुड, आणि अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. सालाव रेवदंडा खाडी पुलामुळे मुरुड तालुक्याचा आर्थिक विकास, सामाजिक, औद्योगिक या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई पुणे येथे जाण्यासाठी चणेरा, रोहा नागोठणे मार्गे वडखळ पेण किंवा साळाव जेट्टी वरून छोट्या होड्यांनी [मचवा] यांनी रेवदंडा पर्यंत पाण्यातून प्रवास करावा लागत असॆ. मात्र हा पूल झाल्यानंतर वाहतूक व्यस्थ जलद गतीने होऊन विकासाची दारे उघडली गेली .पुलच्या निर्मितीपूर्वी मुरुड तालुका हा मागासलेला होता. सन १९८५-८६ मध्ये हा पूल वाहतुकीस खुला झाला अन मुरुड तालुक्याचे रूपच पालटले. ह्या पुलाच्या निर्मितीनंतर मुरुड तालुक्याचे नाव हे पर्यटन क्षेत्रात जागतिक स्तरावर गेले आहॆ. साळाव येथे १९८७-८८ दरम्यान बिर्ला उद्योग समूहाचा लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला त्यामुळे वाहतूक व्यस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तालुक्यातील तसेच अलिबाग तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध शकलॆ.
काही वर्षापूर्वी या पुलाकडे सार्व जनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी स्पष्ट दिसत होतॆ. मात्र त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी [पत्रा] लावून त्या ठिकाणी कॉक़्रिटिकरण करण्यात आले होतॆ. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे देखील बुजविण्यात आले होतॆ. परंतु काही महिन्यापूर्वी परत भेग पडली आहे त्याचप्रमाणे पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग हा समुद्रात कोसळला आहॆ. गेल्या काही वर्षात तीन ते चारवेळा रोह तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेट्टीवर जाणाऱ्या दगडी कोळसाच्या अवाढव्य बार्जने धडक मारल्याने हा पूल अधिकच कमकुवत झाला आहॆ. वर्षाचे बारा महिने हि मुरुड तालुक्याला प्रती गोवा म्हणून पर्यटक यांची संख्या हि लाखोंच्या घरात जात आहे ह्या पुलावरून पर्यटक यांच्या वाहनचा ताफा हा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहॆ. त्याचप्रमाणे अवजड वाहनेही यां पुलावरून ये-जा करीत आहॆ. रेवदंडा पोलिस ठाणे अंतर्गत असणाऱ्या साळाव येथे तपासणी नाका आहे तेथील कर्मचारी यांनी ह्या अवजड वाह्नाविरुध कारवाई केलेली होती. मात्र सार्वजनिक विभाग अलिबाग यांनी या पुलावरून ठळक अक्षरात किती क्षमतेची वाहने जाता येतील. असा फलक लावणे नितांत गरज आहॆ
अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवदंडा या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्व जनिक बांधकाम विभागाने बेलकडे सहाण या मार्गे यामार्गावरील नागाव या गावाला जोडणाऱ्या सहाण -पाल्हे या बाह्या मार्गावर असलेल्या साखर खाडी नामक पूल १९८६ साली उभारण्यात आले आहॆ. या पुलाची लांबी ५२. मीटर एवडी असून १०. मीटरचे प्रत्येकी पाच गले आहेत या पुलाला सुद्धा तीस वर्षे झाली आहेत या पुलावरून दिघी पोर्ट च्या आगारदांडा या तसेच जे.एस.डब्ल्यू साळाव या ठिकाणी जाणारी अवजड वाहने सुद्धा या पुलावरून गेल्याने या पुलाची सुद्धा दुर्दशा झाली असून या पुलाच्या खालील भागाचचे कॉंक्रीट्रीकारण केले भाग काही ठिकाणी खाडीमध्ये कोसळला असून त्याच्या लोखंडी शिगा [सळ्या ] बाहेर आलेल्या आहेत तसच या पुलाची भिंतीमधील काही ठिकाणी असलेली दगडी कोसलेली आही.त्यामुळे हा पूल अधिकच कमकुवत झाला आहे यापुलावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे भरल्या असल्यामुळे वरून पूल भक्कम दिसतो. तसेच नागवकडे (खारगल्ली )बाजूस जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणारा भाग हा निमुळता असल्याने वाहने घसरून पडण्याची शक्यता वाढली आहे. सदरच्या खाडी पुलामुळे नागाव येथून रोहा कडे जाणाऱ्या नागरिकांना ह्या रस्त्याने अंतर कमी लागत आहे मात्र भविष्यात साखर खाडी पूल बंद झाला तर जवळ पास १० गावांचा संपर्क तुटणार आहॆ.
त्याचप्रमाणे नवेदर बेली पूल हासुद्धा जुना असून त्याचीसुद्धा दुरवस्था झाली असून या पुलाचे बांधकाम विभागने दोनवेळा काम केले मात्र त्या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या संरक्षित असणारे लोखंडी पाईप सुधा निघाले आहेत त्याच प्रमाणे आक्षी येथे काही वर्षापूर्वी नवा पूल बांधण्यात आला असून तत्या पुला शेजारी जुना पूल आहे नव्या पुलावरून अलिबाग येथे जाणारी वाहने तर अलिबाग येथून येणारी वाहने हि जुन्यापुलावरून जात आहेत मात्र भविष्यात आक्षी पुलावरून जाणारे आणि अलिबाग येथून येणारे वाहन ह्यांच्यात टक्कर होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या मार्गावर दुभाजक असावा असि मागणी वाहन चालक तसेच स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
आक्षी येथून रेवदंडा येथे जात असताना नागाव रायवाडी या मार्गे काही पर्यटक हे नागाव बीच वर जात असतात तर काही हे रेवदंडा येथे येत असतात मात्र अक्षी रेवदंडा हा मार्ग अरुंद असल्याने एकाचवेळी दोन मोठी वाहने हि समोरासमोर आली कि वाहतूक कोंडी हि होत असते .त्याच प्रमाणे गुरवारी हा नागवाचा आठवडा बाजार असल्याने त्या बाजारात येणारा विक्रेता हा आपले दुकान रस्त्या लागत उभारत असतो त्य दुकानात खरेदी करण्यासाठी ग्राहकही रस्त्यावर उभे राहून खरेदी करीत असतात.
त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी हि होत असते नागाव आक्षी हा रस्ता करण्यासाठी दोन ते तीन वर्षांपूर्वी सार्व जनिक बांधकाम विभागाने कामास सुरवात केली मात्र आजपर्यंत ह्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे काही वेळा एस टी बस ह्या नागाव रायवाडी मार्गे बेलेकडे फाटा अलिबाग आशा जातात. तर काही वेळा मध्येच काम काढले तर नागाव सहान मार्गे अलिबाग असा प्रवास करावा लागत असतो. ह्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल आणि ग्रामस्थांसहित वाहन चालाकांना सुखाचा प्रवास करता येईल हे सांगणे कठीण झाले आहे. दरवर्षी हा रस्ता व्हावा या साठी विविध राजकीय पक्ष्याच्या वतीने रस्ता रोको सारखे आंदोलने सुद्धा उभारण्यात येते मात्र प्रत्येकवेळी अलिबाग संबंधित अधिकारी हे गोड बोलून आंदोलन कर्त्याना आश्वासनाची खैरात करून त्यांची रवानगी करीत होते त्या मूळे ह्या रस्त्यासाठी कोणी वाली उरला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाने साखर खाडी पूल नव्याने बांधावे कारण हा जुना पूल पडल्यास जवळपास १० ते १२ गावांचा संपर्क तुटेल पर्यायाने रेवदंडा आक्षी या मार्गावर वाहतूक वाढेल त्यमुळे वाहतूक कोंडी होईल :- अश्रफ घट्टे.अध्यक्ष, अलिबाग विधान सभा अध्यक्ष, समाजवादी पक्ष

काही वर्षापूर्वी धरमतरचा जुना पूल वाहतुकीस धोक्याचा ठरला होता व त्यठिकाणी शासनाने नवा पूल बांधला पण त्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना कर [टोल ] भरावा लागला होता तीच परिस्थी भविष्यात या पुलाची होईल अन प्रयाणे वाहतूक खर्चही वाढेल :- केवलचंद भलगट, माजी सदस्य अखिल भारतीय कांठा प्रांतीय जैन ओसवाल साजना संघ ,महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *