रोहा तालुक्यातील प्रशासनातील सर्वच विभागांचे कार्य कौतुकास्पद:- ना. अदिती तटकरे  पंचायत समिती कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न 

Share Now

375 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) राज्यात कोरोना महामारी मुळे आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी सामाजिक संस्था यांसह प्रशासनातील विविध विभागांनी जास्तीतजास्त रक्तदान शिबिरे आयोजित करत राज्याला जाणवणारा हा रक्ताचा तुटवडा दुर करावा असे आवाहन केले आहे. त्या आवाहनास प्रतिसाद देत रोहा पंचायत समिती मधील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच रोहा तालुक्यातील महसूल,आरोग्य, पोलीसयांच्यासह पंचायत समिती मधील सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.त्यामुळे तालुक्यातील प्रशासनातील सर्वच विभागांचे कोरोना काळात सुरु असलेले कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे.असे गौरोद्गार रायगड च्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी रोहा पंचायत समितीच्या स्व. द. ग. तटकरे सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन त्यांचे हस्ते केल्यानंतर काढले.

शुक्रवार २५ जुन रोजी घेण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी डॉ.यशवंतराव माने, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरिक्षक नामदेव बंडगर, उपसभापती रामचंद्र सकपाळ, जिल्हापरिषद सदस्य दयाराम पवार,पंचायत समिती सदस्या विणा चितळकर, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, पंडीत राठोड, रा.जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,विजयराव मोरे, विनोद पाशीलकर, सुरेश मगर,नगरसेवक महेश कोलाटकर, महेंद्र दिवेकर, महेंद्र गुजर, नंदकुमार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना विषाणुच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी देशभरासह राज्यात दीड वर्षापासून विविध निर्बंधाद्वारे लॉकडाउन बजावण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांतील रुग्ण व अपघातग्रस्तांच्या साठी लागणाऱ्या रक्ताच्या साठ्यात तुटवडा जाणवू लागला. याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यभर प्रशासनातील सर्व विभाग यांचेसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी रक्तदान शिबिरे घेत रक्ताच्या साठ्याची उपलब्धता करावी असे आवाहन केले होते. रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे या देखील कोरोना काळात प्रशासनाला मार्गदर्शन करत कोरोनाच्या या संकटकाळी अविरत विविध उपाययोजना करत आहेत. रायगड जिल्ह्यातही मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहना नुसार रक्तदान शिबिरे घ्यावीत अश्या सुचना त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या.त्याअनुषंगाने शुक्रवार २५ जुन रोजी रोहा पंचायत समिती कार्यालयात सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तदान शिबीर घेण्यात आले.पालकमंत्री ना. तटकरे यांनी आवर्जून या उपक्रमास उपस्थितीत रहात याचा शुभारंभ केला.

या निमित्ताने पंचायत समिती आवारात त्यांचे हस्ते वृक्षारोपण करत माझी वसुंधरा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.रोहा पंचायत समितीचे प्रशासकीन अधिकारी संजय कवितके ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे ,कृषी विस्तार अधिकारी अशोक महामुनी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे, शिक्षण विस्तार अधिकारी साधुराम बांगारे, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता प्रशांत  म्हात्रे,पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ. सचिन भोसले,बांधकाम उपविभाग अभियंता भुजवंत शिंदे, एकात्मिक बालविकास विभागाच्या शरयू शिंदे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.