अनोळखी पुरुषाचा मृतदेह नांगलवाडी गावच्या हद्दीतील सावित्री नदी पात्रात आढळला, महाड एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

Share Now

115 Views

महाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील नंागलवाडी गावच्या हद्दीतील सावित्री नदीपात्रात सावित्री जॅकवेलच्या धरणाच्या पहिल्या गाळ्यांमध्ये 35 ते 40 वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह शुक्रवार 25 जून राेजी सकाळी 8 वाजणेचे पूर्वी आढळून आला आहे. या घटनेची खबर मनोहर शांताराम महाडिक वय 55 रा.नांगलवाडी यांनी दिली.

या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 13 /2021 मध्ये सीआरपीसी 174 प्रमाणे करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय.आर. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आर.वी. भोसले हे अधिक तपास करीत आहेत.

सावित्री नदी पात्रामध्ये मृतदेह आढळण्याच्या घटना सुरूच असून काही महिन्यांपूर्वीच पिंपरी येथील उद्योजक आनंद उनवणे यांचा मृतदेहदेखील सावित्री नदी पात्रात याच ठिकाणाहून काही अंतरावर आढळून आला होता. मात्र नंतर हा गुन्हा तपासाकरिता पिंपरी चिंचवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आता सापडलेल्या अनोळखी पुरुषांच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना कितपत यश प्राप्त होते हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *