निलिकॉन कंपनीत आगीची दुर्घटना, दोन कामगार भाजले

Share Now

56 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती मधील निलिकॉन फूड्स ॲंड डाईज या कंपनी मध्ये शुक्रवार २५ जुन रोजी युनिट १ मधील १३ नंबर प्लांट मध्ये आग लागण्याची दुर्घटना घडली आहे.एएनएफ या फिल्टर प्रक्रिया भागात सायंकाळी पावणेसहा च्या दरम्यान अचानकपणे लागलेल्या या आगीत तेथे काम करणारे दोन कामगार हे भाजले आहेत.दुर्घटना घडताच या दोन्ही कामगारांना तातडीने प्रथमोपचार करण्यासाठी रोहा शहरातील डॉ. जाधव नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले.त्यानंतर या दोन्ही कामगारांना खबरदारी म्हणून एरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथील उपचारासाठी हलविण्यात आले.अश्या प्रकारची दुर्घटना कंपनी मध्ये प्रथमच होत असल्यामुळे हे नक्की कश्यामुळे झाले याचा तपास कंपनीसह कारखाना निरिक्षक यांचे कडून करण्यात येत असल्याची माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी विनय मोकाशी यांनी दिली आहे.

शुक्रवार २५ जुन रोजी प्लांट न १३ मध्ये दुसऱ्या पाळीतील कामगार नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ए.एन.एफ या फिल्टरमधील यलो पावडर नावाचे उत्पादन काढण्यासाठी झाकण उघडले असता अचानक आगीच्या ज्वाळा आल्या व त्यामध्ये विजय मारुती जाधव रा गोवे, ता.रोहा व छगन कृष्णा पवार रा. तळाघर, ता. रोहा हे भाजले. हे दोन्ही कामगार कंत्राटी पद्धतीने कंपनी मध्ये काम करत आहेत.यातील विजय जाधव हा थोडा जास्त भाजला असून छगन पवार हा कमी प्रमाणात भाजला आहे.ही घटना घडताच या दोन्ही जखमी कामगारांना रोहा मध्ये प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी एरोली,नवी मुंबई येथे हलविण्यात आले. आता दोन्ही कामगारांची प्रकृती उत्तम असून कंपनिच्या वतीने सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे जनसंपर्क अधिकारी शेट्टी यांनी सांगितले आहे.कंपनीने कारखाना निरीक्षक यांना या दुर्घटनेची माहिती देताच शनिवारी कारखाना निरीक्षक श्री. मोहिते यांनी कंपनीस भेट देत पाहणी केली.प्रथम दर्शनी ए. एन .एफ. या फिल्टर मधून आगीच्या ज्वाळा निघून ही दुर्घटना घडली असल्याचे त्यांनी सांगत याबाबत सर्व चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *