रोहा नगरपरिषदे तर्फे डॉ.चिंतामणराव देशमुख कॉलेज ते डंपींग ग्राउंड रस्ता दुरुस्ती, त्रस्त नागरिकांचे मधून समाधान

Share Now

139 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदे मधील रेल्वे स्टेशन नवीन वसाहती कडे जाणाऱ्या डॉ. चिंतामणराव देशमुख कॉलेज पासून सुरु होणाऱ्या रस्त्याची पुर्णतः दुरावस्था झाली होती.यामुळे येथून येजा करणाऱ्या सर्वप्रकारच्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.स्थानिक पत्रकार,रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, माजी सरपंच अनंतराव देशमुख यांनी खा.सुनिल तटकरे पिंगळसई ग्रामपंचायत भूमिपूजन प्रसंगी आले असता या रस्त्याचे काम नगरपरिषदे मार्फत करावे अशी विनंती वजा मागणी केली होती. काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पक्का रस्ता उभारणे नगरपालिकेस सध्यस्थितीत शक्य नसले तरी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्षा रिदवाना शेट्ये,आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर व नगरसेवक महेश कोलाटकर यांनी पावसाळा सुरु होताच तातडीने या मार्गावरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात केली.पावसाळ्यातील खड्ड्यात साचलेले पाणी व चिखल यातून मार्गक्रमण करताना त्रस्त झालेले या नागरिकांचे मधून रोहा अष्टमी नगरपरिषद तात्पुरती का होईना दुरुस्ती करत असल्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत.

रोहा रेल्वे स्टेशन जवळील डॉ. चिंतामणराव देशमुख कॉलेज व लगतचा परिसर हा २००६ च्या नगररचना विभागाने मंजूर केलेल्या रोहा अष्टमी शहराच्या सुधारित विकास आराखड्या नुसार नगरपरिषदे मध्ये समाविष्ट झाला आहे.यानंतर नगरपरिषदे मार्फत खा.सुनिल तटकरे यांचे आशिर्वादाने व तत्कालीन नगराध्यक्ष समीर शेडगे, विद्यमान नगराध्यक्ष व तत्कालीन पाणीपुरवठा सभापती संतोष पोटफोडे यांचे प्रयत्नांनी पाणीपुरवठा वाहिनी टाकत या भागातील नागरिकांची तहान भागविली. त्यानंतर या संपूर्ण भागातील रस्त्यांवर दिवाबत्तीची व्यवस्था करत मूलभूत सुविधा पुरविण्यास सुरुवात केली.आता या भागात भविष्यातील विकासाचा वेध घेता नियोजनबद्ध रस्त्यांचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने विकास आराखड्यानुसार रस्ते सर्वेक्षण कार्य सुरु केले आहे.असे असताना या भागात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याचा वापर पिंगळसई, धामणसई पंचक्रोशीतील नागरिकांसह नवीन वसाहती मधील नागरिक हे रोहा शहरात येजा करण्यासाठी करत आहेत. खा. तटकरे यांचे प्रयत्नांनी धामणसई -अष्टमी या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे मजबुती करण व डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी तांत्रीक अडचणी आल्यामुळे कॉलेज ते रोहिदास नगर या भागातील रस्ता होवू शकत नसल्याची खंत खा. तटकरे यांनी रोहा मधील सर्व पत्रकार, सिटिझन फोरम अध्यक्ष आप्पा देशमुख,माजी सरपंच अनंतराव देशमुख हे वेळोवेळी करत असलेल्या मागणी मुळे व्यक्त केली. त्यानंतर पिंगळसई ग्रामपंचायत भूमिपूजन प्रसंगी खा. तटकरे यांचे कडे पुन्हा ही मागणी केली त्यावेळी तांत्रिक अडचणी दुर होईपर्यंत न थांबता या मार्गाचे काम रोहा नगरपरिषदेच्या माध्यमातून तात्पुरते तरी होणार असे आश्वासन दिले होते.त्यानुसार आता या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या हा मुख्य प्रवेश मार्ग आता खड्डे मुक्त होणार असल्यामुळे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व टीम नगरपरिषद यांना धन्यवाद व्यक्त करत नागरिकांचे मधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *