डंपींग ग्राउंड दुरावस्था, ग्रामस्थांची तक्रार, नगराध्यक्षांनी घेतली दखल

Share Now

406 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे डंपींग ग्राउंड हे पिंगळसई, धामणसई, मालसई या ग्रामपंचायतींच्या सीमेवर आहे.सद्यस्थितीत डंपींग ग्राउंडची अंतर्गत व बाह्य भागात पुर्णतः दुरावस्था झाली आहे.यासोबतच या ठिकाणी नगरपरिषद वगळता लगतच्या ग्रामपंचायतींचा सर्वप्रकारचा कचरा हा चोरिछुपे आणून बाहेर टाकण्याचे प्रमाणही वाढत आहे. याचा त्रास या डंपींग ग्राउंडला लागून असलेल्या रस्त्यांवरून येजा करणाऱ्या या पंचक्रोशीतील नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. डंपींग ग्राउंडच्या पडलेल्या संरक्षण भिंती, बाहेर टाकलेला सर्वप्रकारचा कचरा यामुळे स्थानिकांच्या शेतजमिनीचे प्रदूषण होत, या दुर्गंधीचा सामना स्थानिकांना सहन करावा लागत आहे. रायगडचे खा. सुनिल तटकरे यांचेकडे पिंगळसई माजी सरपंच अनंतराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली तिन्ही ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांनी डंपींग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाबाबत कैफियत मांडली. त्यानुसार खा. तटकरे यांचे आदेशानुसार नगराध्यक्ष संतोष पोटफोडे तातडीने दखल घेत मंगळवार २९ जुन रोजी डंपींग ग्राउंड परिसराची पाहणी केली.

यावेळी आगामी काळात स्थानिकांना डंपींग ग्राउंड मुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करा अश्या सूचना आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर व स्वच्छता निरीक्षक निवास पाटील यांना दिल्या.यावेळी नगरसेवक महेश कोलाटकर, अनंतराव देशमुख, पिंगळसई उपसरपंच तानाजी देशमुख, संकेत देशमुख, निलेश जंगम,हेमंत मालुसरे, मारुती तुपकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रोहा अष्टमी नगरपरिषदेचे डंपींग ग्राउंड मध्ये शहरातील सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात येतो.या डंपींग ग्राउंडला लागूनच साळवी वाडा, गावठाण, धामणसई, सोनगाव,मालसई, मुठवली ही गावे आहेत. यासर्व गावांतील नागरिकांच्या शेतजमिनी या संपूर्ण परिसरात आहेत. यासोबतच रोहा रेल्वे स्टेशन व शहरात येण्यासाठी याच डंपींग ग्राउंडच्या बाजूने गेलेल्या रस्त्यांचा वापर करावा लागतो.असे असताना सद्यस्थितीत डंपींग ग्राउंडची झालेली दुरावस्था, दुर्गंधी, प्रदूषण याचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे. डंपींग ग्राउंडची संरक्षण भिंत पडलेल्या असल्यामुळे वाऱ्याने प्लास्टिक व अन्य कचरा हा वाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने पिकांवर परिणाम होत आहे. नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी स्वतः डंपींग ग्राउंडा भेट देत ग्रामस्थांच्यासह पाहणी करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी डंपींग ग्राउंडच्या बाहेर टाकण्यात येणाऱ्या कचरा त्यामध्ये मृत जनावरांचाही समावेश असल्यामुळे आम्हाला दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यासोबतच रात्रीच्या वेळी रोहा शहरा शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायतिंच्या कचऱ्याच्या गाड्या कचरा टाकत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.नगरपरिषद वगळता बाहेरून येणाऱ्या कचरा गाड्यांवर कारवाई करत त्या बंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासोबतच येथील पडलेल्या संरक्षण भिंती उभारण्यात बाहेरील सर्व परिसर स्वच्छ करत त्या ठिकाणी वृक्षारोपण करत येथील सौंदर्य वाढवा अशी विनंती केली.खा. सुनिल तटकरे यांचे आदेशानुसार ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत सर्व तक्रारींची दखल घेत सर्व सुधारणा करणार असे आश्वासन नगराध्यक्षांनी सर्व ग्रामस्थांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.