रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कोव्हिडयोद्धा म्हणून सन्मान

Share Now

50 Views

रोहा (वार्ताहर)रोहे तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे प्रेसिडेंट मयूर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून रोहे अष्टमी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कोव्हिडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

कोव्हिडच्या अत्यंत कठीण व आव्हानात्मक काळात ज्यांचे दुर्दैवाने म्रुत्यु झाले त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे केल्याचे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले.

रोहे अष्टमी नगरपालिका सभागृहात संपन्न झालेल्या या ह्रुदयस्पर्शी सोहळ्यासाठी रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,उपनगराध्यक्षा रीदवाना शेट्ये,गटनेते महेंद्र गुजर,नगरसेवक समीरभाई सकपाळ,महेश कोल्हटकर,रोटरी सदस्य राकेश कागडा,गणेश सरदार,सुचित पाटील,निखिल दाते,रूपेश कर्णेकर,विजय दिवकर,सुधीर भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी या स्तुत्य पुढाकाराबद्दल रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे विशेष कौतुक करून या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचा यथोचित गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन क्लब डायरेक्टर निखिल दाते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *