पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कारखान्यांची गय केली जाणार नाही :- एमपीसीबीचा सज्जड इशारा, उपप्रादेशिक अधिकारी व्ही.व्ही किल्लेदार यांनी घेतली तक्रारींची दखल

Share Now

47 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा औद्योगिक वसाहतीचा उप प्रादेशिक अधिकारी म्हणून महिनाभरापुर्वी पदभार घेतला. त्यामध्ये विविध प्रसारमाध्यमांतुन या औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांमधून रसायनयुक्त पाणी नैसर्गिक नाल्यांमधून सोडले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. यासोबतच येथील स्थानिक नागरिकही यासंबंधित त्यांच्या तक्रारी सोशल मिडियाच्या माध्यमातून करत होते. याची दखल घेत आज रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन, कारखानदार व कंपन्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्योगांना सर्वतोपरी सहकार्याची भूमिका ही असेलच मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करताना कोणतीही गय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही.व्ही. किल्लेदार यांनी शुक्रवार २ जुलै रोजी झालेल्या या बैठकी नंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.

यासोबतच एमआयडी सी संचालित सामाईक प्रक्रिया केंद्राचे सध्या विस्तारीकरण होत आहे. मात्र हे होत असताना त्यांचेकडुनही प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या लेखी सुचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आगामी काळात धाटाव मधील सर्वच कारखाने व एमआयडीसी या आदेशाचे पालन कसे करतात याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.

धाटाव औद्योगिक वसाहती मध्ये रासायनिक व रंगीत पाणी नाले व गटारांचे वाहण्याच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. जुन महिन्यात पावसाळा सुरु होताच औद्योगिक वसाहती मधून वाहणारे बहुतांशी नैसर्गिक नाले व गटारे हि जणु रंगीत व रासायनिक पाण्याने ओथंबून वाहु लागले होते.याच्या बातम्या वर्तमानपत्रात व इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून वेळोवेळी येत होत्या.स्थानिक नागरिकांनीही यासंबंधी नाराजी व्यक्त करत सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्या होत्या.यासर्व तक्रारींची दखल नव्याने उप प्रादेशिक अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या किल्लेदार यांनी घेतली. यासंबंधी त्यांनी शुक्रवारी आरआयए च्या कार्यालयात संबधितांची बैठक घेतली.या बैठकीत रोहा औद्योगिक वसाहत ही सर्वात जुनी व नावलौकिक मिळविलेली आहे. मात्र असे असतानाही गेले महिनाभर येथून प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत.

कारखान्यांनी त्यांचेकडील कोणत्याही प्रकारचा पाणी हा नाले गटारांचे मध्ये जाणार नाही याची दक्षता घेण गरजेचे आहे. त्यांचे कडील हा सर्व पाणी सीईटीपी केंद्रातच जाणे गरजेचे आहे.त्यामुळे यापुढे ज्या कारखान्यांचे पाणी बाहेर जाईल त्यांचे कारवाई करताना कोणतीही हयगय केली जाणार नाही.यापुढे तक्रारी आल्यास आमचे अधिकारी तात्काळ पाहणी करत दोषी कारखान्याला कारवाईला सामोरे जावे लागणार असे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *