अंगणात खेळतअसलेल्या अल्पवयीन मुलीला घरात नेऊन नराधमाने केला बलात्कार , कोलाड परिसरात एकच खळबळ

Share Now

197 Views

कोलाड (शाम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड खांब विभागातील मढाली आदिवासीं वाडी, ऐनवहाळ तेथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडलीआहे, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या खल्यात बाहेर एकटीच खेळत असताना, आरोपी राहणार मढाली आदिवासीं वाडी, पो. ऐनवहाळ तालुका रोहा, वय वर्ष 22 याने
त्या लहान मुलीस त्याचे राहते घरात बोलाऊन एकटी असल्याचा फायदा घेऊन घराचा दरवाजा लाऊन नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून सर्वत्र एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे,

याविषयी कोलाड पोलिस स्टेशनचे उपनिरिक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती बोराडे, पोलिस ए.एल.घायवट हे पुढील अधिक तपास करत आहेत. आरोपी विरोधात कोलाड पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम 376 नुसार बाल अत्याचार संरक्षण पोस्कौ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.