धाटाव येथे DMCC कंपनीमध्ये कोविड लसीकरण केंद्राचे कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संभाजीराव जाधव यांच्या हस्ते उदघाटन

Share Now

47 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्या साठी रोहा येथे (कोविड19 विरोधातील) *लसीकरण केंद्र* चालू आहे परंतु त्या केंद्रा वर होणारी नागरिकांची गर्दी यामुळे या केंद्रानवर येणार लोड व कामगार, कर्मचाऱ्यां चा होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी धाटाव येथे दि. धरमसी मोरारजी केमिकल कंपनी (DMCC) या कंपनीने आपल्या कंपनीमध्ये आज कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केले त्या केंद्राचे उद्घाटन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संभाजीराव जाधव यांच्या हस्ते आज पार पडले.

केंद्राचा फयदा कंपनी तील मधील कामगार, कर्मचारी कॉन्ट्रॅकर, कॉन्ट्रॅक्ट लेबर व कामगार आणी कर्मचाऱ्यां च्या कुटुंबातील व्यक्ती ना ही होणार आहे आशा वर्गाचे लसीकरण यामुळे जलद गतीने होणार आहे. यामुळे रोहा तालुक्यातील करोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. या उद्घाटनप्रसंगी फॅक्टरी मेडिकल ऑफिसर अनिल यादव, गगनगिरी हॉस्पिटल चे टीम मेंबर डॉ. संजय सावंत, विशाल नांगरे,विक्रम सणस, सौ. आरती म्हात्रे, डॉ.किरण फाळके यांच्या उपस्थितीत आज पासून केंद्रा वर लसीकरणा ला सुरवात झाली आहे. सदरहु कार्यक्रमा चे नियोजन एच. आर. डिपाटमेंट चे मॅनेजर श्री. रमेश राधाराम यांनी त्यांचे सहकारी राकेश खांडेकर, केतन पवार, अनिकेत पाटील यांनी उत्कृष्ट केले सदरहु कार्यक्रमास कामगार व कर्मचारी यांच्या उपस्थितत कोरोना व सुरक्षा चे नियम पाळून संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *