घरगुती गॅस इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर, महागाईविरोधात मोदी सरकारचा जाहिर निषेध

Share Now

147 Views

रोहा (प्रतिनिधी)केंद्र सरकारने वाढविलेल्याघरगुती गॅस इंधन दरवाढ व महागाई विरोधात रोहा शहरात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार विरोधात निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी वाढत्या महागाईचा निषेध ही व्यक्त करण्यात आला. रोहा नगर परिषदेच्या समोर शनिवार दिनाक ३जुलै रोजी रोहा तालुक्याच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. रोहा तालुका राष्ट्रवाडी काँगेस पार्टी महीला आघाडी, युवक, युवती, तसेच विविध ग्रामपंचायत सरपंच, नगर सेवक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. गॅस इंधन दरवाढ, महागाई विरोधात यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी विरोधी केंद्रं सरकारचा यावेळी जाहिर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादिचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, महाराष्ट्र सरचिटणीस विजयराव मोरे, रोहा तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, उपसभापती रामचंद्र सकपाळ, सरपंच वसंत भोईर, माजी जिप सदस्य नंदकुमार म्हात्रे, रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटील, अमीत मोहिते, संजय पाटील, आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर, नगरसेवक महेश कोलटकर, रोहा शहराध्यक्ष अमित उकडे, महीला तालुका अध्यक्ष प्रीतम पाटिल, शहर अध्यक्षा प्रजेक्ता चव्हाण, उपनगराध्यक्षा शेटे, तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, संतोष पार्टे, अमीत मोहिते, सतेज आपणकर, राम नाकती, सरपंच उदेश वाडकर, किशोर पाटील, सागर भोबड, मयूर पायगुडे, निलेश शिर्के, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.