मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर वकील वर्गाचा विश्वास : पुणे शहरात भव्य पक्षप्रवेश

Share Now

169 Views

रोहा (अंजुम शेटे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 30 जून रोजी शेकडो वकिलांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी राज्य सरचीटणीस ॲड. अरुण लंबुगोळ, राज्य उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के, पुणे शहर अध्यक्ष ॲड. सतीश कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. अरविंद मते, ॲड. नरेंद्र वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष ॲड. समीर इनामदार व पुणे शहर सचिव ॲड. जमीर इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये इच्छूक वकीलांच्या मुलाखती घेऊन विधी विभागामध्ये पदनियुक्त्या जाहीर केल्या.

यावेळी पुणे शहर व जिल्हा पद नियुक्ती करण्यात आली. शिवाजीनगर व कोथरुड विधानसभा मतदारसंघ उपशहर अध्यक्षपदी ॲड. चैतन्य दिक्षीत, पर्वती व खडकवासला विधानसभा मतदारसंघ उपशहर अध्यक्षपदी ॲड. अभिषेक जगताप, पुणे शहर सचिवपदी ॲड. शैलेश गुरव, शिरुर तालुका अध्यक्षपदी ॲड. आदित्य मैड, कोथरुड विधानसभा मतदारसंघ विभाग अध्यक्षपदी ॲड. पराग दुसाने, खडकवासला विधानसभा मतदारसंघ विभाग सचिवपदी ॲड. निरज महाजन, शहर कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. कपिल काळे, ॲड. सुशांत तायडे, ॲड. रोहित पाटील, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ उपविभाग अध्यक्षपदी ॲड. दिपाली गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच पुणे शहरातून वकील वर्गाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभागामध्ये प्रवेश करण्यासाठी ओघ वाढतच असून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेच्या दृष्टीकोनातून याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.