कोलाड विभागातील रस्त्यानजीकचे चायनीज सेंटर बनले दारूचे गुत्ते

Share Now

1,185 Views

रोहा (प्रतिनिधी) आजकाल चायनीज पदार्थांचे भलतेच फॅड असंख्य तरुणांना उध्वस्त करीत आहे. चायनीज पदार्थांची आवड अनेकांसाठी कमजोरी ठरत आहे. चायनीज पदार्थात सर्रासपणे रसायनयुक्त पदार्थ वापरण्यात येत असल्याने सबंध सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. एवढेच काय ? हेच काही चायनीज सेंटर दारूचे गुत्ते बनत असल्याचे धक्कादायक वास्तवं आहे.
रोहा शहर मुख्यतः कोलाड विभागाच्या रोहा ते कोलाड खांब, वरसगाव, आंबेवाडी सर्वच रस्त्यांवरील बहुतेक चायनीज सेंटर अक्षरशः दारूचे गुत्ते बनल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दररोज रात्री उशीरा असंख्य तरुण गटातटाने चायनीज सेंटरवर मद्यप्राशन, ध्रुमपान करीत असल्याचे आढळून आले. याचे सर्वाधिक प्रमाण कोलाड विभागातील चायनीज सेंटरवर आहे. कोलाड, वरसगाव, आंबेवाडी, खांब नाक्यावरील काही चायनीज सेंटर व हॉटेल्स धाब्यावर तरुण मद्यपान करीत असल्याचे समोर आले. दरम्यान, चायनीज सेंटरवर तरुण उध्वस्त होत आहे. अधिक बेकार होत आहे असे असताना विभागातील पोलीस दुर्लक्ष का करतात, चायनीज सेंटर चालकांकडे परवाना आहे का ? असा लावलं उपस्थित झाला आहे. चायनीज खाद्यपदार्थांची चव लहानगे यांसह सर्वच गटातील माणसाला कमजोर बनवित आहे. काही चायनीज पदार्थांतील अजिनोमोटो अनेकांच्या जीवावर उठला. तरीही सरकार सबंधित प्रशासकीय यंत्रणा जागी नाही. चायनीजचे इतर पदार्थ लोकप्रिय असले तरी रस्त्यावरचे बहुतेक चायनीज सेंटर दारूचे गुत्ते ठरत आहेत. रोहा शहर, सर्वच ग्रामीण यांसह कोलाड विभागातील चायनीज सेंटर चालकमालक मद्यपीना बसण्याची मुभा देतात. त्यामुळे अनेक लहान मोठे तरुंण टोळके चायनिजवर दारू, ध्रुम्रपान करीत असल्याचे भयावह चित्र आहे. विनापरवानाची दारू अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होते. काही हॉटेल मालक विनापरवाना दारूची विक्री करतात. याचेही प्रमाण मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड विभागातील काही हॉटेलात खूप वाढले आहे. त्यामुळे नाक्यावर असलेल्या चायनीज सेंटरवर हेच तरुण रात्री उशिरापर्यंत दारू व धुम्रपान करीत असतात.
रोहा, कोलाड विभागातील मटक्याने कोर्पोरेडची जागा घेतली. त्यामुळे मटका अचानक पडद्याआड गेला. तरीही अंशतः काही ठिकाणी मटक्याचे आकडे दिसून येतात. गुटख्यावर अंकुश असल्याने छुपी विक्री तरुणांपासून दूर आहे. त्यामुळे कॉलेज व अन्य तरुण फारसे बिघडत नाहीत. मात्र दारू सहज उपलब्ध होत आहे. चायनीज सेंटर स्वस्त खाद्य ठिकाण मिळत आहे. दरम्यान, कोलाड हद्दीतील उशिरापर्यंत चालणारे चायनीज सेंटर, तिथे बसणारे मद्यपी तरुणांचा घोळका, त्यातून उध्वस्त होणारा तरुण अशा सामाजिक समस्यांवर घाला घालणार कोण ? असा सवाल उपस्थित झाला आहे. तर कोलाड विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रशांत तायडे चायनीज सेंटरच्या भलत्याच विळख्यातून तरुणांची सुटका करतात का, सर्रास मद्यपींना मुभा देणाऱ्या चायनीज सेंटरवर कोलाड पोलीस काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 thoughts on “कोलाड विभागातील रस्त्यानजीकचे चायनीज सेंटर बनले दारूचे गुत्ते”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *