काशीद पूल गेला वाहून, कोणतीही जीवीत हानी

Share Now

42 Views

मुरूड जंजिरा (अमूलकुमार जैन) अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून गेला आहे.

ही घटना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. नदीत आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हा पन्नास वर्षाचा जीर्ण झालेला पूल वाहून गेला.

अलिबाग-मुरुड हा रस्ता बंद झाला आहे. एक चार चाकी वाहन व एक मोटारसायकल सह पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. यात एक मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह मिळाला आहे. मृत व्यक्ती एकदरा येथील असून त्यांचे नाव विजय चव्हाण आहे, अशी माहिती मुरूडचे नायब तहसिलदार रवींद्र सानप यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *