कोलाड येथे प्राण्यांच्या आश्रमात मॅनेजरने केला अपहार, गुन्हा दाखल

Share Now

134 Views

कोलाड (वार्ताहर) विठठलवाडी येथील प्राण्यांच्या आश्रमामध्ये स्टाप मॅनेजर म्हणुन काम करणाऱ्या कडे
विश्वासाने दिलेल्या अॅनिमल मॅटरटु मी मुंबई संस्थेच्या आश्रमा मधिल एकूण 45,000/- रुपये किमतीच्या वस्तु मॅनेजर यांने अपहार केले असून कोलाड पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोलाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 23/11/2020 रोजी 18:00 वा. ते दि.09/07/2021 रोजी 18:00 वा.दरम्यान मौजे विठठलवाडी येथे आरोपीत रा. मालाड मुंबई हे मौजे विठठल वाडी येथील प्राण्यांच्या आश्रमामध्ये स्टाप मॅनेजर म्हणुन काम करीत असुन मौजे विठठलवाडी येथील प्राण्यांच्या आश्रमामध्ये आरोपीत याच्याकडे विश्वासाने दिलेल्या अॅनिमल मॅटरटु मी मुंबई संस्थेच्या आश्रमामधिल एकूण 45,000/- रुपये किमतीच्या वस्तु आरोपीत यांने अपहार करून स्वताच्या फायदया करीता वापर करून संस्थेचे मालमत्तेचे कागद पत्राचा गैर वापर करून सदरची माहिती एनजिओ श्रीमती संगीता डोंगरा तसेच दुर्गा रॉय यांना माहिती देवुन तसेच अॅनिमल मॅटरटु मी या संस्थेची तसेच संस्थेचे संस्थापक श्री.गणेश राम नायक यांचे खाजगी मालमत्तेसंदर्भात चुकिच्या पध्दतीने प्रसिध्दीकरून बदनामी केली.

याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 63/2021 भा.दं.वि.क. 408 ,500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोलाड सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
पोसई/श्री.घायवट हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.