रोहा केळघर आदिवासीवाडी मुरुड मार्गावर मुसळधार पावसात दरड कोसळली, सुदैवाने जीवित हानी नाही, वाहतुकीसाठी रस्ता बंद

Share Now

169 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा केळघर मार्गे मुरुड मार्गावरील केळघर आदिवासी वाडी नजीक मुसळधार पावसात दरड कोसळली असल्याने हा मार्ग काही तास बंद झाला होता, रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या दगडीसह माती झाडे पडल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. रस्त्यावर दगड, मातीसह मोठ मोठी झाडे उलमलून पडली असून दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचे समोर आले.

मागील 17 जून रोजी याच मार्गावर दरड कोसल्याची घटना घडली तद्नंतर 12 जुलै रोजी पुन्हा मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळून मार्गावर पडली असल्याने रोहा केळघर मुरुड मार्ग बंद झाला आहे. तर कोसळलेल्या दरडीमुळे शेती आणि रस्ता मार्गाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच रोहा बांधकाम विभागाचे अधिकारी घाडगे व बिरगावले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व हा मार्ग वाहतुकीसाठी
लवकरात लवकर खुले केले जाणार असल्याचे सांगितले आहे. रोहा केळघर मार्गे मुरुड जाणा-या रोडवर कवळटे गावाजवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली असून सदर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला असून घटनास्थळी दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तरी, सदर मार्गे प्रवास करणा-या नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अधिकारी वर्गातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.