विलास एजन्सीच्या नूतन वास्तूचे ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते उदघाटन

Share Now

329 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहे बाजारपेठेतील प्रामाणिकता व सचोटीच्या बळावर १०० वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या विलास एजन्सी व नव्याने सुरु झालेल्या दर्शन इंटरप्रायजेसच्या नूतन वास्तुचे रायगडच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरेंच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या परिवाराची नाळ गेल्या 100 वर्षापासून रोहेकरांशी जुळलेली आहे. कै. भाईंनी स्वकष्टाने व आपल्या मधाळ व म्रुदु स्वभावाने या व्यवसायाचा पाया भक्कम केला, त्यांचे तिनही सुपुत्र व आता नातू देखील या भक्कम पायावर कळस उभारण्याचे काम करीत आहेत.
विलास एजन्सी म्हणजे रोहे बाजारपेठेतील एक लोकप्रिय दालन. हे दालन प्रत्येकाला आपलेसे वाटते कारण तिथे येणाऱ्या ग्राहकाला फक्त वस्तूंची विक्री होत नाही तर आस्थेने व आपुलकीने प्रत्येकाची चौकशी देखील केली जाते, वेळप्रसंगी अडीअडचणीला खिशात पैसे नसले तरी तिथे आपल्याला माल मिळेल अशी खात्री ग्राहकांच्या मनामध्ये नेहमीच असते. कै. भाई म्हणजे चैतन्य,स्नेह व आपुलकीचा वाहता झरा होते त्यांचा वारसा त्यांचे तिन्ही सुपुत्र पूढे सक्षमपणे चालवत आहेत.

कै. भाई दुकानातील सर्व कारभार बघत असताना ग्राहकांना मिळणाऱ्या सौजन्यपूर्ण व आपुलकीयुक्त वागणुकीत तसूभरही फरक पडलेला नाही.
त्यांचे सुपुत्र विलास व प्रशांत दुकानात व महेंद्र सार्वजनिक जीवनात नेहमीच येणाऱ्या सगळ्यांशी प्रेमाने व आदबीने वार्तालाप करतात. रोह्यातील अनेक घरांशी नाळ जुळलेले हे दालन आज आधुनिकतेची नवीन कात टाकत आहे व एक दुग्धशर्करा योग म्हणजे जुन्या दालनाच्या नुतनीकरणाबरोबरच दर्शन महेंद्र गुजर यांच्या दर्शन एन्टरप्रायझेस या नवीन सेवा दालनाचाही शुभारंभ होत आहे.

स्व. लालजी गुजर यांचे नंतर त्यांचे चिरंजीव स्व. रमेश ऊर्फ भाई गुजर यांनी व्यवसाय करताना जपलेली सामाजिक बांधिलकीची जाण हाच वारसा पुढे त्यांचे चिरंजीव महेंद्र, विलास, प्रशांत चालवत असल्यामुळे आज या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,नगरसेवक महेश कोलाटकर, महाडचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत गुजर,सुरेश मगर ,महमद डबीर,सूर्यकांत शिंदे, यशवंत शिंदे, ललित गुजर,पृथ्वीराज जाधव,जालिंदर शेवाळे, कादिर रोगे, मयुर पायगुडे, महेंद्र खैरे, चंद्रकांत पार्टे , राकेश जैन आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.