रोहा महसूल खात्यातील मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी लाच घेताना अटक

Share Now

3,367 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील महसूल खात्याचे भ्रष्टाचारी कारनामे याआधीही दिव जमीन प्रकरणाने चव्हाट्यावर आले आहेत.आता यासर्व भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश अलिबाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत केला आहे. रोहामधील घोसाळे मंडळाचे प्रभारी अधिकारी राजेश वसंत जाधव व सारसोलीचे तलाठी महादेव जगन्नाथ मोरे यांना २५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. यामुळे रोहा तालुक्यात खळबळ माजली असून सर्व सामान्य शेतकऱ्यांमध्ये या कारवाईने समाधान व्यक्त होत आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहीतीनुसार यामधील तक्रार यांची तलाठी सजा भालगाव मध्ये वडिलोपार्जित जमीन होती. तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांची जमीन नोंदणीकृत बक्षिसपत्र करत तक्रारदार यांचे नावे केली होती. यानंतर या जमिनीच्या सातबाऱ्यावर आपले नाव लागावे यासाठी आरोपी तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे वारंवार तक्रारदार यांनी चौकशी केली. त्यानंतर आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे याकामासाठी ३००० रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तक्रारदार व आरोपी यांचेत २५०० रुपयांची तडजोड झाली. गुरुवार १५ जुलै रोजी दुपारी रोहयात मंडल अधिकारी कार्यालयात सापळा लावत मंडळ अधिकारी व तलाठी यांना लाचेची २५०० रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक रायगड विभागाच्या पोलीस निरीक्षक किशोर साळे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक अरुण घरत,पो. ह. दिपक मोरे,पो.ह.सुरज पाटील, पो. ना. कौस्तुभ मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *