मयत पोलीस कर्मचारी याच्या मुलास अनुकंपा तत्वावर पोलीस अधिक्षक दुधे यांनी त्वरीत भरती केले, कुटुंबाला न्याय दिल्याने सर्वत्र पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे कौतुक

Share Now

26 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या रायगड पोलीस दलातील चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नथु भोईर यांचे 25 मार्च 2021 रोजी कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला होता. पोलीस दलात कर्तव्य बजावणा-या भोईर यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले यांच्यावर मोठा प्रसंग ओढावला होता. अश्या परीस्थितीत कुटुंबांतील कर्ता पूरष गेल्याने कुटुंबाची हेळसांड होऊ नये व यापुढे या सहा.फौजदार पोलीस यांना कोणत्याही अडीअडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी या गोष्टीची गांभीर्याने दाखल घेत लागलीच दोन महिन्यातच मयत सहाय्यक फौजदार यांच्या कुटुंबातील त्यांचा 25 वर्षीय मुलगा विशाल रामचंद्र भोईर याला तात्काळ अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई पदावर रुजू करुन घेतले.
त्यामुळे भोईर यांच्या कुटुंबाला जगण्याची नवी उर्जा मिळाली व मयत भोईर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला वा-यावर सोडले गेले नाही याचे आत्मिक समाधान या कुटुंबाला मिळाले.

सहाय्यक फौजदार मयत भोईर यांच्या मृत्यू पश्चात शुक्रवार 16 जुलै रोजी त्यांचा मुलगा विशाल भोईर यास रायगड पोलीस दलात त्वरीत भरती केल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. रायगड पोलीस दलाचे कुटूंब प्रमुख या नात्याने सदर कुटुंबास आधार देऊन त्यांचे पुढील आयुष्य सुखकर होण्यास मदत झाली आहे. मयत पोलीस कर्मचारी याच्या मुलास अनुकंपा तत्वावर पोलीस अधिक्षक दुधे यांनी त्वरीत भरती केले. महत्वाचे म्हणजे
कुटुंबाला न्याय दिल्याने सर्वत्र पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *