रोह्यात सतत चार दिवस मुसळधार पाऊस, धाटाव स्टॉप नाल्यावरील अवैध गाळा पावसात पडला, शेजारील राकेश म्हसकर यांचे फार मोठे आर्थिक नुकसान

Share Now

144 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील धाटाव स्टॉपवर स्थानिक नागरीकांनी अवैध्य गाळे बांधले आहेत. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी नागरीकांची धडपड सुरु आहे त्यासाठी एमआयडीसीच्या सांडपाणी जाणा-या मोठ्या नाल्यावर अवैद्यरीत्या आरसीसी पोल उभे करुन गाळा बांधण्यात आला होता. मात्र रोह्यात सतत चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या एमआयडीसीच्या मोठ्या मुख्य नाल्यावर बांधलेल्या आरसीसी पोलवर उभा केलेला दुकान गाळा खाली पडला आहे. सदर गाळ्याचे अर्धवट बांधकाम झालेले होते त्यामुळे या गाळ्यात कोणतेही व्यावसाय सुरु नव्हता. महत्वाचे म्हणजे एमआयडीसी मुख्य नाल्यावर विटा, वाळू व आरसीसी कॉलम उभे करुन या मालकाने अवैध पण खुप खर्च केला होता.

या गाल्याच्या शेजारी असलेल्या राकेश म्हसकर यांच्या छोट्या हॉटेल गाल्याचे खुप मोठे नुकसान झाले. राकेश म्हसकर यांच्या गाळ्याच्या एका भिंतीवर हा गाळा कोसळल्याने भिंतीला तडा गेला आहे व दुकाणाच्या मधोमध मोठा तडा गेला आहे. त्यामुळे राकेश म्हसकर यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले तरी आर्थिक मदतीचे गरज आहे. धाटाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन तोट्यात चाललेल्या राकेश म्हसकर यांना आर्थिक मदत करावी असे म्हसकर यांचे मत आहे.

रोहा शहरापासून काही अंतरावर धाटाव एमआयडीसी आहे. त्यामुळे धाटाव स्टॉपवर फार मोठ्या प्रमाणात व्यापारी गाळे व भाड्याच्या खोल्या बांधल्या गेल्या आहेत. यातील मालकी हक्क असलेल्या 40 टक्के खोल्या व दुकान गाळे सोडले तर 60 टक्के नागरिकांनी व्यापारी गाळे व भाड्याच्या खोल्या अवैधरीत्या बांधल्या आहेत. जागा मोकळी दिसली कि त्या जागेवर आक्रमण करुन सुरवातीला भराव नंतर पत्र्याची शेड आणी नंतर बांधकाम करण्याचे प्रमाण वाढले आहे. धाटाव ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत आहे.अश्या ग्रामपंचायतीमध्ये असे अवैधरीत्या बांधकामे सर्रास केली जात आहेत.यावर धाटाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अश्या अवैध बांधकांमांवर कारवाई होणे आवश्यक आहे असे नागरीकांतून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *