रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निरिक्षकपदी संजय वढावकर यांची निवड, अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Share Now

167 Views

रोहा(वार्ताहर) कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व कामगारांच्या न्याय हक्कासाठी यशस्वीपणे लढा देणारे कामगार नेते जनरल मजदूर सभा ठाणे व हिंद मजदूर सभा महाराष्ट्र या संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांची रायगड राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निरिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संजय वढावकर यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निरिक्षकपदी निवड केली. खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या हस्ते संजय वढावकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच कर्जत तालुक्यातील दहीवली येथील राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली. यावेळी खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पक्षश्रेष्टींनी दिलेली जबाबदरी तसेच येणाऱ्या काळात रायगड़ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा  करुन जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करणार व भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकीत पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देणार, पक्ष संघटना आधिक बळकट करण्याच्या द्रुष्टीने संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्धार जिल्ह्याचे नवनिर्वाचित निरीक्षक संजय वाढावकर यांनी व्यक्त केला. रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निरिक्षकपदी संजय वढावकर यांची निवड झाल्याबद्दल रायगड़ जिल्ह्यातील सर्व तालुके यांसह रोह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.