355 Views
कोलाड (श्याम लोखंडे) मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड नाका सुपर मार्केट जवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड वनरक्षक अधिकारी व त्यांच्या कर्मचारी वर्ग यांनी सापळा रचून पकडला आहे.
सदर या बाबत सविस्तर वृत्त असे कि बुधवार दि.१ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील पडगा येथून चिपळूण सावर्डे येथे खैर भरून जाणारा ट्रक गाडी नंबर GJ१५, AT ७८५१ हा कोलाड येथील सुपर मार्केट जवळ वनरक्षक अधिकारी कांबळी व अजिंक्य कदम यांनी सापळा रचून पकडले असुन वनरक्षक अधिकारी यांनी वाहनचालक नजमुद्दीन याला ताब्यात घेतले असुन याबाबत अधिक तपास कोलाड वनरक्षक अधिकारी करीत आहेत.